Kokum health benefits and side effects in Marathi.

कोकम खाण्याचे फायदे व तोटे article by Dr Satish Upalkar.

कोकम – Kokum (garcinia indica) :

कोकम हे कोकणातील फळ असून त्यापासून आमसुले व कोकम सरबत बनवले जाते. कोकमची फळे ही गोल आकाराची व लाल असतात. फळातील गर हा आंबट असतो. आयुर्वेदानुसार कोकम हे लघु, रूक्ष, आंबट, आम्लविपाकी व उष्णवीर्य आहे. तसेच ते कफवातशामक आहे.

कोकम फळात citric acid, acetic acid, Malic acid, Ascorbic acid, hydroxycitric acid & garcinol ही पोषकतत्वे असतात. तसेच यात पोटॅशिअम, मँगेनीज व मॅग्नेशिअम ही खनिजतत्वे देखील असतात.

कोकम खाण्याचे फायदे –

कोकममुळे शरीरातील उष्णता कमी होते. पचनक्रिया सुधारते. अपचन, पोट फुगणे आणि पोटात गॅस होणे अशा समस्या होत नाहीत. कोकम खाल्याने रक्तदाब व वाईट कॉलेस्टेरॉल कमी होते. यामुळे वजन कमी होते. तसेच विविध त्वचाविकारात कोकम उपयुक्त ठरते. असे कोकम खाण्याचे अनेक फायदे होतात.

1) कोकम खाण्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
कोकमपासून बनवलेले सरबत पिण्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात या सरबताने थंडावा मिळतो, तहान भागते.

2) कोकम खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
कोकममुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. अपचन, पोट फुगणे आणि पोटात गॅस होणे अशा समस्या होत नाहीत. कोकम सरबत पिण्यामुळे पचनक्रिया सुधारून भूक वाढते. तसेच शौचाला पातळ होत असल्यास कोकम सरबत प्यावे. मूळव्याधच्या त्रासात देखील हे सरबत फायदेशीर ठरते.

3) हृदयाच्या आरोग्यासाठी कोकम उपयुक्त असते.
कोकममध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच यातील hydroxycitric acid मुळे वाईट कॉलेस्टेरॉल कमी होते. पर्यायाने हृदयाच्या आरोग्यासाठी कोकम उपयुक्त असते.

4) कोकममुळे वजन कमी होते.
कोकमातील हायपोकोलेस्टेरोलेमिक घटकामुळे शरीरात चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कोकममुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5) कोकममुळे कॅन्सरपासून बचाव करते.
कोकममधील Garcinol कॅन्सरविरोधी घटक असतात. त्यामुळे लहान आतड्यांचा कॅन्सर, यकृत कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर यापासून दूर राहण्यास मदत होते.

6) कोकम खाण्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते.
कोकममध्ये hepatoprotective antioxidant असतात. यामुळे दारूच्या व्यसनाने यकृतावर होणारे दुष्परीणाम कमी होण्यास मदत होते.

7) त्वचाविकारात कोकम उपयोगी असते.
शीतपित्तमुळे अंगाला खाज येत असल्यास कोकमची साल किंवा आमसूल चोळावे. यामुळे होणारी खाज कमी होते. हातापायांना भेगा पडल्यास किंवा ओठ फुटल्यास तेथे कोकमची साल चोळणे उपयुक्त असते. कोकममध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे विविध त्वचाविकारात ते उपयोगी पडते.

कोकम खाण्याचे तोटे –

कोकम खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात कोकम खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, पोटात जळजळ होणे, अॅसिडिटी होणे यासारखे त्रास होऊ शकतात.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा –
केळी खाण्याचे फायदे
फणस खाण्याचे फायदे
सफरचंद खाण्याचे फायदे
डाळींब खाण्याचे फायदे
पपई खाण्याचे फायदे

4 Sources
 1. A Phytopharmacological Review on Garcinia indica
  https://www.florajournal.com/vol3issue4/Oct2015/3-2-16.1.pdf
 2. The chemistry and medicinal uses of the underutilized Indian fruit tree Garcinia indica Choisy (kokum): A review
  https://pubag.nal.usda.gov/catalog/505848
 3. Antimicrobial and Cytotoxic Effects of Garcinia indica
  http://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.415.2367&rep=rep1&type=pdf
 4. Kokum (Garcinia Indica) and its Many Functional Components as Related to the Human Health: A Review
  http://jakraya.com/journal/pdf/6-jfrtArticle_1.pdf

In this article information about Kokum health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *