Custard Apple health benefits and side effects in Marathi.
सीताफळ – Custard Apple :
सीताफळ हे स्वादिष्ट फळ असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. सीताफळमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण असते. यात कॅरेनोइक ऍसिड, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स अशी महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात.
सीताफळ खाण्याचे फायदे –
सीताफळ खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. हृदयाच्या आरोग्यासाठी सीताफळ फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पचन क्रिया देखील सुधारते. सीताफळ खाण्यामुळे पोट साफ न होणे, छातीत जळजळ होणे अशा समस्या यामुळे दूर होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सीताफळ उपयुक्त असते. सीताफळ खाण्याचे असे अनेक फायदे आहेत.
सीताफळ खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो.
सिताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. या घटकांमुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. ब्लड प्रेशर नियंत्रित राहिल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनीं सीताफळ जरूर खावे.
सीताफळ खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
सिताफळात व्हिटॅमिन-C असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार दूर राहतात.
सीताफळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.
सिताफळामध्ये कॅरोटीनॉइड अँटीऑक्सिडंट मुबलक असते. हे ल्युटीनयुक्त अँटिऑक्सिडेंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. यामुळे मोतीबिंदू, वयासंबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD) अशा डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.
सीताफळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
सीताफळमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी सीताफळ जरूर खावे. तसेच यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
सीताफळ खाल्ल्याने ॲसिडीटीचा त्रास दूर होतो.
सीताफळ खाल्ल्याने छातीत होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे ॲसिडीटीचा त्रास झाल्यास सीताफळ खावे.
सीताफळ खाण्याचे तोटे –
सीताफळमध्ये कमी प्रमाणात विषारी घटकही असतात. विशेषतः त्यामुळे अधिक सीताफळे खाणे धोकादायक ठरू शकते. यातील विषारी घटकाचा परिणाम मेंदू आणि मज्जासंस्थेवर (nervous system) वर होऊ शकतो.
सीताफळ कसे खावे..?
पिकलेल्या सीताफळातील गर खाऊ शकता. सीताफळाच्या बिया आणि सालीत एनोनासिन हे विषारी घटक असतात. त्यामुळे सीताफळ खाताना सीताफळाचा फक्त गरचं खाल्ला पाहिजे. याच्या बिया आणि साल खाऊ नये.
डायबेटिस रुग्णांनी सीताफळ खावे का..?
डायबेटिस रुग्णांनी सीताफळ खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा. डायबेटिस रुग्णांनी शक्यतो सीताफळ खाणे टाळले पाहिजे. डायबेटिस रुग्ण हे कधीतरीच एखादे सीताफळ खाऊ शकतात.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा –
– केळी खाण्याचे फायदे
– फणस खाण्याचे फायदे
– सफरचंद खाण्याचे फायदे
– डाळींब खाण्याचे फायदे
– पपई खाण्याचे फायदे
In this article information about Custard Apple health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.