काचबिंदू आजार – Glaucoma :

काचबिंदू म्हणजे Glaucoma. काचबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर असा आजार आहे. ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य माहिती ही ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असते. मात्र या विकारात या महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला आढळतो. काचबिंदू आजाराला English मध्ये Glaucoma (ग्लॅकोमा) असे म्हणतात.

काचबिंदूमध्ये प्रामुख्याने डोळ्यांच्या आत हाय प्रेशर निर्माण झाल्याने त्याचा परिणाम ऑप्टिक नाडीवर होऊन ही स्थिती निर्माण होते. यामुळे व्हिजन लॉस (दृष्टी कमी होणे) किंवा अंधत्वसुद्धा येऊ शकते.

काचबिंदू ची लक्षणे (Glaucoma symptoms) :

दृष्टी हळूहळू कमी होणे यासारखी काही लक्षणे काचबिंदूत असू शकतात. तसेच प्रत्येकाला काचबिंदूची लक्षणे जाणवतील असेही नाही. काचबिंदूला ‘डोळ्यांचा सायलेंट किलर’ असेही म्हणतात. यासाठी प्रत्येकाने दरवर्षी आपल्या डॉक्टरांकडून डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

काचबिंदूमध्ये अँगल क्लोझर ग्लुकोमा याप्रकारात खालील लक्षणे जाणवू शकतात.

काचबिंदू होण्याची कारणे (Causes of glaucoma) :

आपल्या डोळ्यांच्या मागे एक विशिष्ट प्रकारचा द्रवपदार्थ म्हणजे ‘अ‍ॅक्वेयस ह्युमर’ तयार होत असतो. यामुळेच आपले डोळे ओलसर राहत असतात. मात्र काही कारणांमुळे जेव्हा, हा द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास डोळ्यातील प्रेशर वाढू लागतो. या वाढणाऱ्या दाबाचा परिणाम महत्त्वाच्या अशा ऑप्टिक नाडीवर झाल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. ऑप्टिक नाडीची अधिक हानी झाल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो.

डोळ्यातील प्रेशर वाढण्यासाठी खालील घटकसुद्धा कारणीभूत ठरू शकतात.

  • स्टेरॉईड्सयुक्त औषधांच्या दुष्परिणामामुळे,
  • ऑप्टिक नाडीला अपुरा रक्तपुरवठा झाल्याने,
  • हाय ब्लडप्रेशरची समस्या यांमुळे डोळ्यातील इंट्राओक्युलर प्रेशर वाढू शकते.

डोळ्यातील प्रेशर 21 mmHg पेक्षा जास्त असल्यास त्या स्थितीला ocular hypertension असे म्हणतात.

काचबिंदू कोणाला होऊ शकतो? (Glaucoma risk factors) :

  • वयाच्या साठीनंतरच्या व्यक्ती,
  • कुटुंबात काचबिंदूची अनुवंशिकता असणे,
  • डोळ्याला दुखापत झालेल्या व्यक्ती,
  • मधुमेही रुग्ण,
  • हाय ब्लडप्रेशरचे रुग्ण,
  • कॉर्टिकोस्टेरॉईड्ससारखी औषधे घेणाऱ्या व्यक्ती यांमध्ये काचबिंदू आजार होण्याचा धोका जास्त असतो.

काचबिंदूचे निदान (Glaucoma Diagnosis) :

रुग्णातील लक्षणे, मेडिकल हिस्ट्री व डोळ्यांची तपासणी करून नेत्ररोगतज्ञ डॉक्टर याचे निदान करू शकतात. याशिवाय टोनोमेट्री टेस्ट करून डोळ्यातील प्रेशर तपासले जाईल. याशिवाय नाडीची तपासणी, पॅकीमेट्री टेस्ट व Perimetry टेस्ट यासुद्धा केल्या जातील.

काचबिंदू आणि मोतीबिंदू यामधील फरक :

काचबिंदू आणि मोतीबिंदू हे दोन्हीही डोळ्यांचे आजार आहेत. मोतीबिंदू आजाराविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे. प्रामुख्याने उतारवयात मोतीबिंदू होत असतो. मात्र मोतीबिंदूवर उपचाराने दृष्टी पूर्वरत होत असते. मात्र काचबिंदूने एकदा कमी झालेली दृष्टी पुन्हा कधीही पूर्वरत होत नाही. त्यामुळे काचबिंदू हा जास्त गंभीर असा डोळ्यांचा विकार समजला जातो. मोतीबिंदूविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

काचबिंदू वरील उपचार (Glaucoma treatments) :

काचबिंदूवरील उपचाराचा उद्देश हा डोळ्यांच्या आतील प्रेशर कमी करणे व असलेली दृष्टी टिकवून ठेवणे हा असतो. कारण काचबिंदूमुळे एकदा गेलेली दृष्टी पुन्हा येत नाही. डोळ्यातील इंट्राओक्युलर प्रेशर (IOP) कमी करण्यासाठी आपले डॉक्टर काही आय ड्रॉप्स किंवा गोळ्या औषधे देऊ शकतात. या उपचारांनी फरक न पडल्यास किंवा द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिणीत ब्लॉकेज असल्यास सर्जरीचा पर्याय निवडला जातो.

काचबिंदू होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

जागतिक आरोग्य संघटनेने ‘काचबिंदू’ हा अकाली अंधत्व येण्याचे दुसरे प्रमुख कारण असल्याचे सांगितलेले आहे. काचबिंदूमध्ये सहसा लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने वयाच्या चाळीशी नंतर वर्षातून एकदा डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. वेळीच काचबिंदूचे निदान झाल्यास बऱ्यापैकी दृष्टी वाचण्यास मदत होईल.

हे लक्षात ठेवा..

  • दरवर्षी नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्या.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही ड्रॉप्स डोळ्यात घालू नका.
  • कुटुंबात काचबिंदूची अनुवंशिकता असल्यास जास्त काळजी घ्या.
  • डायबेटीस असल्यास त्यावर डॉक्टरांकडून उपचार चालू ठेवा.
  • ब्लडप्रेशर आटोक्यात ठेवा.
  • डोळ्यात वेदना होत असल्यास, अस्पष्ट दिसत असल्यास तात्काळ दवाखान्यात जावे.

डोळ्यासंबंधीत खालील उपयुक्त माहितीही वाचा..

Read Marathi language article about Glaucoma (Kachbindu) causes, symptoms diagnosis and treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

3 Comments

  1. नाही, काचबिंदू हे केवळ नाव दिलेले आहे. या त्रासाचा आणि काचेसारखे दिसण्याचा काही संबंध नाही. काचबिंदू मध्ये डोळ्यात अतिशय दुखू लागते.

  2. Dear Sir,

    मला वर्ष 1998 दरम्यान माझ्या डव्या डोल्याच्या कडेला एक जोरात दगडाचा फटाका बसला होता., त्यामुले डोल्याच्या कडेला थोडे काळे पण पडाले होते, मात्र काही दिवसाने ते गेले. तेव्हा माझा डोला दुखला नाही. पुधे 2 वर्षा नन्तर त्यांच डोल्यातून 2 ते 3 महीन पाणी गलात होते मात्र ऊपचारा साठे पैसे नसल्याने मी काही करू शकलो नाही. पुढे ते ठिक झाले . आता 2024 माझे वय 44 पूर्ण झाले आहे. मात्र मला मागिल 3 ते 4 वर्षा पासुन असे जानवते की माझा तोच दावा डोलाला उजव्या डोल्याच्या मनाने कामी दिसाते donhi hat saral reshet thevlyas davya
    hatachi halchal samjat nahi matra उजव्या हाताची हलचल जावते मात्र दव्या हाताची हलचल जाणवत नाही. थोडे पुढे ग्यावा लागतो तेव्हा समजते.
    matra dola ajunahi kadhi dukhala nahi.
    Dr. mala kalu shakte ka mala kay asel.
    Is it glaucoma? or Anything?
    Aaplya Bz scedule madhun mala madat karavi hi Vinanti..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *