हिरडी सुजणे (Swollen Gums) –
हिरडी सुजल्यामुळे तेथे अतिशय दुखू लागते. विशेषतः दात घासताना किंवा जेवण खाताना त्रास अधिक होत असतो. अनेक कारणांनी हिरड्या सुजत असतात. हिरडी सुजल्याल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते.
हिरडी सुजणे यावरील काही सोपे उपाय –
हिरडी सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरडीला आलेली सूज कमी होते.
हिरड्या सुजल्यास दातात लवंग धरून ठेवावी. यामुळे हिरडीतील सूज व वेदना कमी होतात.
आल्याच्या पेस्टमध्ये मीठ मिसळून ती पेस्ट सूज आलेल्या हिरडीवर लावावी. दहा मिनिटांनी चूळ भरून तोंड धुवावे. यामुळे हिरडीची सूज कमी होते.
हिरडी सुजल्यास तेथे थोडासा बेकिंग सोडा लावावा. या उपायाने हिरडीची सूज कमी होते.
हिरडी सुजणे यावरील टॅबलेट –
हिरडीला सूज येऊन दुखत असल्यास ibuprofen, paracetamol किंवा diclofenac ची टॅबलेट घेऊ शकता. वरील वेदनाशामक गोळीमुळे आलेली सूज व वेदना कमी होतात.
मात्र अशा वेदनाशामक गोळ्यांमुळे अपचन होणे, मळमळ होणे, पित्त वाढणे, डोके दुखणे, संडासला लागणे असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे हिरडीला सूज आल्यास गोळी घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून पहावेत. सोप्या घरगुती उपायांनी हा त्रास लगेच कमी होऊ शकतो.
ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तसेच अल्सर, हाय ब्लड प्रेशर, किडनी विकार असणारे रुग्ण, गरोदर स्त्रिया यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही वेदनाशामक गोळी घेऊ नये.
हे सुध्दा वाचा – हिरडी मजबूत करण्याचे उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Swollen Gums and Medicine Tablet. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.