चेहऱ्यावरील वांग – Hyperpigmentation :
आपला चेहरा सुंदर व डागविरहीत असावा असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर वांग आलेले आढळतात. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहरा कुरूप दिसू लागतो. चेहऱ्यावरील वांगमुळे अनेकजण हैराण होत असतात.
त्वचेच्या काही भागात मेलेनिन अधिक तयार झाल्याने तेथील त्वचा गडद दिसू लागते. तेथे काळे डाग किंवा टिपके येतात. ही वांग समस्या असून चेहऱ्यावर आणि मानेच्या ठिकाणी प्रामुख्याने ही समस्या अधिक होत असते. प्रामुख्याने उन्हात फिरल्याने वांग समस्या होते. तसेच हार्मोन्समधील असंतुलन, काही औषधांचा परिणाम यामुळेही ही त्वचेची समस्या होते.
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय –
ऍपल सायडर व्हिनेगर, एलोव्हेरा जेल, कापलेला बटाटा, दही, लिंबाचा रस अशा अनेक घरगुती पदार्थांचा वापर हा चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी प्रभावी ठरतो.
1) ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी मिसळून वांगावर लावावे ..
ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते, ज्यामुळे रंगद्रव्य कमी होऊ शकते. एका वाटीत थोडे ऍपल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात समभाग पाणी मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावरील वांग असणाऱ्या ठिकाणी लावा आणि दोन ते तीन मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायाने चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी चांगली मदत होते.
2) वांग असलेल्या ठिकाणी कोरपडीचा गर लावा ..
हायपरपिग्मेंटेशनवर कोरपड खूप प्रभावी ठरते. यासाठी झोपण्यापूर्वी वांग असणाऱ्या ठिकाणी कोरपडीचा गर किंवा एलोव्हेरा जेल लावावा. व दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी हा उपाय काही दिवस नियमित करावा.
3) वांग जाण्यासाठी मसूर डाळीचा फेस मास्क लावा ..
एका भांड्यात 50 ग्रॅम मसूर रात्रभर भिजत ठेवा. भिजलेले मसूर मिक्सरवर वाटून त्याची बारीक पेस्ट करावी. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी मसूर डाळीचा हा घरगुती उपाय खूप उपयोगी पडतो.
4) वांग असलेल्या ठिकाणी दही लावा ..
वांग आलेल्या ठिकाणी दही लावा आणि 20 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी हा घरगुती उपाय काही दिवस नियमितपणे करणे गरजेचे आहे.
5) वांग असलेल्या ठिकाणी बटाटा चोळावा ..
वांग आलेल्या ठिकाणी कापलेला बटाटा चोळावा आणि 20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.
6) वांग असलेल्या ठिकाणी लिंबू रस व मध लावा ..
एक चमचा लिंबू रसात मध मिसळून ते वांग असलेल्या ठिकाणी चेहऱ्यावर लावा व 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी हा उपाय काही दिवस केल्यास ही समस्या दूर होते.
हे सुध्दा वाचा –> चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी उपाय जाणून घ्या.
वांग होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- उन्हात फिरताना प्रखर उन्हापासून बचावासाठी त्वचेला सनस्क्रिन लावा.
- उन्हात फिरताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
- प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्समुळे वांग समस्या जास्त होते. यासाठी प्रेग्नंट महिलांनी उन्हात बाहेर फिरताना योग्य काळजी घ्यावी.
- जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
- जास्त प्रमाणात ब्लीचिंग करणे टाळावे.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.
अशी काळजी घेतल्यास चेहऱ्यावर वांग समस्या होत नाही.
हे सुध्दा वाचा –> चेहरा गोरा होण्यासाठी उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Home Remedies For Pigmentation. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.