मधुमेह समस्या –

बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, चुकीचा आहार यामुळे बरेचजण मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते. साखर वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या मधुमेही रुग्णांना होऊ लागतात. यासाठी ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घ्यावी लागते.

मधुमेह आणि घरगुती उपाय –

1) मधुमेह रुग्णांनी तुळशीची पाने चावून खावीत ..

रोज सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन तुळशीची पाने चावून खावीत. या घरगुती उपायाने ब्लडशुगर नियंत्रित राहते. कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना इन्सुलिन निर्मितीसाठी सक्रिय करतात.

2) मधुमेह रुग्णांनी ग्रीन टी प्यावी ..

ग्रीन टी पिणे हे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते. कारण यामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते. हे एक सक्रिय अँटी-ऑक्सिडेंट आहे, जे ब्लडशुगर नियंत्रित करण्यास मदत करते.

3) मधुमेह रुग्णांनी जांभूळ खावे ..

काळे मीठ लावून जांभूळ खाल्याने ब्लडशुगर कमी होण्यास मदत होते.

4) मधुमेह रुग्णांनी पनीर फुलाचे पाणी प्यावे ..

रात्रभर ग्लासभर पाण्यात 2 ते 3 पनीर फुल भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी गाळून घेऊन प्यावे. यामुळे ब्लडशुगर आटोक्यात राहण्यास मदत होते. मधुमेह रुग्णांनी पनीर फुलाचा कसा वापर करावा ते जाणून घ्या..

मधुमेहावर घरगुती उपाय करताना घ्यायची काळजी –

मधुमेह रुग्णांनी कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी ही गोष्ट आधी विचारात घ्यावी की, कोणताही घरगुती उपाय हा मधुमेह वरील सर्वोत्तम असा उपचार होऊ शकत नाही. डॉक्टरांनी दिलेली औषधे, योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी या चार गोष्टीमुळेच मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो. आणि ह्या चार गोष्टींचे पालन मधुमेह रुग्णांनी जीवनभर करणे आवश्यक असते.

कोणत्याही जाहिरातीला बळी पडून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मधुमेहावर कोणतेही घरगुती उपचार करू नका. मधुमेह वर घरगुती उपाय म्हणून कसला तरी रस पिणे हे धोकादायकचं असते. यामुळे मधुमेह रुग्णांची ब्लडशुगर अचानक कमी होऊन प्रसंगी जिवावरही बेतू शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच मुख्य म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधेही परस्पर बंद करू नयेत.

हे सुध्दा वाचा – मधुमेह विषयी माहिती व उपचार जाणून घ्या.

Read Marathi language article about Diabetes home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *