Dr Satish Upalkar’s article about Applying Castor Oil On Belly Button benefits in Marathi.
बेंबी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा असा भाग आहे. नाभीत एरंडेल तेल घालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बेंबीला एरंडेल तेल लावल्याने अनेक फायदे होऊ शकतात. यामुळे आरोग्य सुधारून अनेक शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे –
बेंबीत एरंडेल तेल टाकल्याने पोटाचे विकार दूर होतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, पोटात गॅस होत नाही. पचनक्रिया सुधारते. केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेला चमक येते. तसेच केसांची वाढ योग्यरित्या होते. मासिक पाळीतील वेदना कमी होतात. यासोबतच वंध्यत्वाची समस्याही दूर होऊ शकते. याशिवाय सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. असे अनेक फायदे बेंबीत एरंडेल तेल टाकण्यामुळे होतात.
नाभीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे –
1) बेंबीत एरंडेल तेल टाकण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात ..
रोजच्यारोज पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता), पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या पोटाच्या अनेक समस्या असतात. बेंबीत एरंडेल तेल टाकण्यामुळे पोटाच्या या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते, पोटात गॅस होत नाही.
2) बेंबीला एरंडेल तेल लावल्याने पचनक्रिया सुधारते ..
नाभीला एरंडेल तेल लावल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी नाभीवर एरंडेल तेल जरूर लावा. पचनशक्ती मजबूत झाल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारखे पोटाचे विकार होत नाहीत. तसेच घेतलेल्या आहाराचे योग्य प्रकारे पचन होऊन आरोग्य चांगले राहते.
3) बेंबीमध्ये एरंडेल तेल घातल्याने प्रजनन क्षमता सुधारते ..
बेंबीमध्ये एरंडेल तेल घातल्याने प्रजनन क्षमता सुधारते. यामुळे स्त्री आणि पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यासाठी वंध्यत्वाची समस्या असल्यास म्हणजे मूलबाळ होत नसल्यास नाभीवर एरंडेल तेल जरूर लावा. वंध्यत्व समस्या व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4) नाभीत एरंडेल तेल घातल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात ..
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोटात अतिशय वेदना होणे, पोटात पेटके येणे यासारखे त्रास होतात. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी बेंबीला एरंडेल तेल लावणे खूप फायदेशीर असते. यामुळे मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदना दूर होतात.
5) बेंबीवर एरंडेल तेल लावल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते ..
बेंबीमध्ये एरंडेल तेल टाकल्याने त्वचेच्या अनेक समस्या म्हणजे, पिंपल्स, ऍलर्जी आणि त्वचेवरील डाग दूर होतात. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारून त्वचेला चमक येते. याशिवाय केसांच्या आरोग्यासाठी ही बेंबीत एरंडेल तेल टाकणे फायदेशीर असते. यामुळे केसांची वाढ सुधारण्यासाठी मदत होऊन केसांच्या इतरही समस्या दूर होतात.
6) नाभीवर एरंडेल तेल लावल्याने सांधेदुखीतील वेदना कमी होतात ..
नाभीमध्ये एरंडेल तेल घातल्याने सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकतात. यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. सांधेदुखी वरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा →
पोट साफ होण्यासाठीचे उपाय जाणून घ्या..
बेंबीतून पाणी येण्याची कारणे व उपचार
Information about benefits of Applying Castor Oil On Belly Button in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.