स्त्री वंध्यत्व – कारणे, निदान व उपचार मराठीत (Female Infertility in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Female Infertility information in Marathi, Female Infertility Causes, Test, Treatment and Prevention in Marathi.

महिलांमधील वंध्यत्व समस्या :

गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष कधीही गर्भधारण करु शकत नाही. मात्र प्रजनन अक्षमतेचे खापर समाजामध्ये पुर्णपणे स्त्रीवरचं नेहमी फोडले जाते आणि अशा स्त्रीस ‘वांझ’ म्हणुन हिनवून तिची अवहेलना केली जाते.

वंध्यत्व कारक घटक :
वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

स्त्रीयांमधील वंध्यत्वाचे प्रकार :
प्राथमिक वंध्यत्व (Primary infertility) आणि द्वितियक वंध्यत्व (Secondary infertility) असे वंध्यत्वाचे दोन प्रकार आहेत.
प्राथमिक वंध्यत्व – यामध्ये स्त्रीस कधीही गर्भधारणा झालेली नसते.
द्वितीयक वंध्यत्व – याप्रकारात स्त्रीस गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात होणे किंवा जन्मानंतर लगेच मुल दगावणे यासारख्या समस्या याप्रकारात असतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :

Causes of female infertility in Marathi.
वंध्यत्वाची कारणे ही गर्भधारणेच्या प्रक्रियेशी संबंधीत असतात. गर्भाधान प्रक्रियेसाठी शुक्राणुचे पुंबीजचे डिंम्बाणुशी (स्त्रीबीजाशी) एकत्रित मिलन होणे गरजेचे असते. शुक्राणुला स्त्रीच्या योनीमध्ये पोहचल्यानंतर गर्भाशयस्थित डिम्बाणु पर्यंत पोहचण्यासाठी एक मोठे अंतर पार करावे लागते. या मार्गात जर कोणतीही बाधा उत्पन्न झाल्यास शुक्राणु आणि डिम्बाणु यांचे मिलन घडून येत नाही त्यामुळे गर्भाधानची प्रक्रिया पुर्ण होत नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत,
• जन्मजात प्रजनन अवयवांमधील विकृतीमुळे,
• पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) या आजारामुळे, ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे. गर्भधारणेस योग्य स्त्रीबीज तयार करण्याची असमर्थता असणे, अनियमित मासिक पाळी, अनार्तव (मासिक पाळी न येणे) यासाख्या समस्या यामुळे उद्भवतात. PCOS आजाराची मराठीत माहिती वाचा..
• हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे,
• हायपोथायरॉडिजम या विकारामुळे,
• स्वस्थ डिम्बाणुच्या निर्मितीस बाधा आणणाऱया घटकांमुळे जसे, Ovaries चा अभाव असणे, Ovaritis या सारखा विकार उद्भवल्याने,अनेक विकारांच्या उपद्रवस्वरुपात स्त्रीयांमध्ये वंध्यत्वता होऊ शकते. जसे प्रतिकारक क्षमतेचे विकार, मधुमेह, अतिस्थुलता, कृशता, अनार्तवता यासारख्या विकारांमुळे वंध्यत्वता होऊ शकते.
• मानसिक ताणतणावामुळे,
• 35 वर्षापेक्षा अधिक वयामुळे,
• कुपोषणामुळे,
• कृत्रिम गर्भनिरोधक साधने, औषधांच्या अतिवापरामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात.

स्त्री-संबधी वंध्यत्वाचे निदान कोणकोणत्या तपासणीद्वारे करतात..?
डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणीबरोबरच जननेंद्रियांच्या तपासणीवर मुख्य भर दिला जातो. यानंतर विशेष तपासणी केली जाते.

लॅप्रोस्कोपी निदान –
पोट, उदर, गर्भाशयासारख्या अवयवांच्या आतील स्थिती जाणून घेण्यासाठी लॅप्रोस्कोप नावाच्या दुर्बिणीसारख्या यंत्राच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या तपासणीस लॅप्रोस्कोपी असे म्हणतात. गर्भाशयाच्या लॅप्रोस्कोपी तपासणीसाठी बेंबीजवळ एक सूक्ष्म छीद्र पाडून लॅप्रोस्कोपमधून गर्भाशयात बघतात. यामुळं गर्भाशय पिशवी, तिचा आकार, स्थिती जाणून घेतात. गर्भनलिका, स्त्रीबीज निर्माण करणाऱ्या ओव्हरीजची स्थिती कळण्यास मदत होते. या तपासणीमुळे स्त्रीबीज वेळच्यावेळी निर्माण होते की नाही? अंडवाहिन्यांचा खुलेपणा व बंद असल्यास अडथळ्याचे स्थान यांचे स्पष्ट निदान होते. तसेच रोगग्रस्त व अकार्यक्षम अंडवाहिन्या, अंडवाहिन्यांभोवतीचे बंध, गर्भाशयातील अर्बुदे व बंध, गर्भाशयाच्या विकृती इत्यादींचेही निदान होते. स्त्री वंध्यत्वासंबधी ही कारणे लॅप्रोस्कोपीमूळे समजण्यास मदत होते. लॅप्रोस्कोपीमुळे एकाच वेळी गर्भाशयाची संपूर्ण माहिती मिळू शकते. गर्भनलिका म्यूकसमुळे बंद असेल, तर लॅप्रोस्कोपीमुळे गर्भाशयाच्या तोंडातून भरलेल्या ओषधामुळं गर्भनलिका पुन्हा मोकळी होऊ शकते. लॅप्रोस्कोपीवेळी क्युरेटिंगचही ऑपरेशन करण्यात येते. तसेचं लॅप्रोस्कोपी करताना आतील अवयवांमध्ये जे जे दिसते त्याचा इंडोस्कोपिक फोटोग्रॉफीच्या सहाय्यानं फोटो काढून ठेवता येतात. त्यानंतर ते फोटो बघून त्यात असलेला दोष सांगता येतो. आणि लॅप्रोस्कोपी एका दिवसातचं पुर्ण होत असल्याने रूग्णाला त्याच दिवशी घरी जाता येतं.

क्युरेटिंग –
ही क्रिया येणाऱ्या मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात केली जाते. वंध्यत्वासाठी उपचार म्हणून क्युरेटिंग ही उपयुक्त ठरत असली, तरी ती मुख्यत्वे तपासणी म्हणून केली जाते. यात गर्भाशयाचं तोंड मोठं करून क्युरेटिंग करतात. गर्भाशयाचा आतील भाग खरवडून मिळणारे अंतःस्तरीय ऊतक पॅथॉलाजीकल तपासणीसाठी पाठवले जाते. या तपासणीमुळं वेळच्यावेळी स्त्रीबीज निर्मिती होते की नाही? हा निष्कर्ष काढता येतो. तसेचं गर्भाशयाच्या पिशवीला क्षयरोगासारखा गंभीर विकार आहे की नाही याचा शोध घेता येतो. एरवी निरोगी भासणाऱ्या स्त्रियांत अंतःस्तराचा किंवा श्रोणीभागातील क्षयरोग हे वंध्यत्वाचे बऱ्याच वेळा आढळणारे कारण आहे.

हवा भरणे –
या तपासणीत विशिष्ट साधनांच्या व उपकरणांच्या साहाय्याने गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात हवा भरली जाते. किमान एक किंवा दोन्ही अंडवाहिन्या मोकळ्या असल्यास ही हवा त्यांच्या दुसऱ्या तोंडातून उदरगुहेत शिरते. उपकरणातील हवेच्या दाबातील बदल, या दाबाचा आलेख, स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने पोटावर श्रवण केल्यास हवा उदरगुहेत शिरताना येणारे बुडबुड्यांसारखे आवाज, मध्यपटलाखाली हवा वा वायू दर्शविणारी क्ष-किरण तपासणी यांवरून किमान एक अंडवाहिनी मोकळी असल्याचे निदान करता येते. ही तपासणी बाह्य रुग्ण विभागात व भूल दिल्याशिवाय करता येण्यासारखी असली, तरी शक्यतो भूल देऊन व संपूर्ण जंतुविरहित परिस्थितीत केली जाते; परंतु खुलेपणा दोन्ही अंडवाहिन्यांच्या बाबतीत असल्याचे ठरविणारी ही खात्रीशीर तपासणी नसल्याने, चुकिच्या निकालांचे प्रमाण यात खूप असल्याने, अंडवाहिन्यांचा निरोगीपणा ठरविता येत नसल्याने व इतर धोक्यांमुळे सध्या ही तपासणी सहसा केली जात नाही

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

याशिवाय गर्भाशयाचा फोटो घेऊनसुद्धा परिक्षण करतात. हार्मोन्सची तपासणी करून हॉर्मोनची स्थिती पाहिली जाते.इस्ट्रोजीन, प्रोजेस्ट्रॉन, F.S.H., L.H. या आंतस्त्रावांंचे परिक्षण केले जाते. ह्या विविध तपासण्यांद्वारे स्त्रियांसंबंधी वंध्यत्वाचे निदान होण्यास मदत होते.

वंध्यत्व संबंधित खालील माहितीही वाचा..
पुरुष वंध्यत्व कारणे व उपचार
वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार
टेस्ट ट्यूब बेबी – IVF मराठीत माहिती
वंध्यत्व तपासणी कशी करतात
महिलांमधील वंध्यत्व आणि ‘पीसीओएस’ ची समस्या

Female Infertility treatments in Marathi.