बेंबी मधून पाणी येणे –
बेंबीची स्वच्छता न राखल्यास बेंबीत बॅक्टेरिया, बुरशीची वाढ होऊन तेथे इन्फेक्शन झाल्याने बेंबी मधून पाणी येऊ लागते. अशावेळी बेंबीतून पांढरट, पिवळसर किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव येऊ लागतो. त्या स्त्रावाला घाण वास सुध्दा येत असतो.

बेंबीतून पाणी येणे याची कारणे –

  • बेंबीची स्वच्छता न ठेवल्याने बेंबीतून पाणी येऊ शकते.
  • बेंबीत बॅक्टेरिया किंवा बुरशीचे इन्फेक्शन होणे,
  • बेंबी जवळ दुखापत झाल्याने,
  • बेंबी जवळ ऑपरेशन झाले असल्यास टाक्यांची योग्य काळजी न घेणे, या कारणांमुळे बेंबी मधून पाणी येऊ लागते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ?
बेंबीतून पाणी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच बेंबीमधून पाणी येण्याबरोबरचं ताप येणे, बेंबी जवळ पू येणे, ओटीपोटात दुखणे, लघवी करताना जळजळ व वेदना होणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

जास्त काळजी कोणी घेणे आवश्यक आहे ?
बेंबी मधून पाणी येणे या त्रासाकडे मधुमेही रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांना बेंबीत इन्फेक्शन होण्याचा धोका हा जास्त असतो. कारण ब्लड शुगर वाढल्याने बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता अधिक असते.

बेंबी मधून पाणी येणे यावरील उपचार –
कारणांनुसार यावरील उपचार ठरतात. बॅक्टेरियामुळे बेंबीतून पाणी येत असेल तर अँटीबायोटिक क्रीम व औषधे दिली जातील. तर बुरशीमुळे बेंबी मधून पाणी येत असेल तर अँटीफंगल क्रीम दिली जाते.

बेंबीतून पाणी येत असल्यास घ्यायची काळजी :

  • बेंबी ची स्वच्छता ठेवावी.
  • अंघोळीच्या वेळी सौम्य अँटीबॅक्टेरियल साबणाने बेंबी स्वच्छ करा.
  • बेंबीच्या आत असलेली घाण देखील साफ करा.
  • आंघोळ केल्यानंतर, टॉवेलने बेंबी कोरडी करा.
  • सुती व मऊसर कपडे वापरा.

हे सुध्दा वाचा –
बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे जाणून घ्या..

कानातून पाणी येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Water discharge from belly button Causes, Treatment and Home remedies . Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *