Dr Satish Upalkar’s article about acne scars Home remedies in Marathi.
चेहऱ्यावरील खड्डे –
चेहऱ्यावरील मुरुमाचे फोड गेल्यावर काहीजणांच्या चेहऱ्यावर खड्डे निर्माण झाल्याचे दिसून येते. चेहऱ्यावरील खड्ड्यांमुळे चेहरा खराब दिसू लागतो. याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होतो. यासाठी चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी घरगुती उपाय याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे सांगितली आहे.
चेहऱ्यावर खड्डे का पडतात ..?
त्वचेचे ओपन पोअर्स, मुरूम, तेलकट त्वचा, उन्हात अधिक फिरणे, आनुवंशिकता अशा कारणांनी चेहऱ्यावर खड्डे पडत असतात. चेहऱ्याच्या त्वचेतील बारीक छिद्रे मोठी झाल्याने चेहऱ्यावर खड्डे होत असतात. या समस्येला ‘ओपन पोअर्स’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे मुरुमाचे फोड नखांनी फोडल्यानेही चेहऱ्यावर खड्डे पडत असतात.
चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी घरगुती उपाय –
1) चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लेप लावा.
मुलतानी मातीमध्ये लिंबू रस आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे. यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील खड्डे निघून जातात.
2) चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी चेहऱ्यावर दही व बेसनची पेस्ट लावा.
दह्यामध्ये थोडे बेसन मिसळून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्यास चेहर्यावरील खड्ड्यांचा आकार बारीक होण्यास मदत होते.
3) चेहऱ्यावरचे खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्याला कोरफडीचा गर लावा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर कोरफडाचा गर नियमितपणे काही दिवस लावावा. कोरफड मध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हा आयुर्वेदिक उपाय चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी खूप उपयोगी पडतो.
4) चेहऱ्यावरचे खड्डे जाण्यासाठी चेहऱ्याला ऑलिव्ह तेलाने मसाज करा.
एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा. त्यानंतर 10 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. हा घरगुती उपाय आठवड्यातून दोनवेळा केल्याने चेहऱ्यावरील खड्डे निघून जाण्यासाठी मदत होते.
5) चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्यावर अॅपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण लावा.
अर्धा कप पाण्यात थोडे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा त्यामुळे त्वचेवरील ओपन पोअर्सचा त्रास कमी होईल. ओपन पोअर्समुळे चेहऱ्यावर खड्डे पडले असल्यास त्यावर हा उपाय उपयुक्त ठरतो.
चेहऱ्यावर खड्डे पडू नये यासाठी घ्यायची काळजी ..
- उन्हात बाहेर जाण्यापूर्वी त्वचेला किमान 30 SPF असणारी सनस्क्रीन लावा. तसेच टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
- रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून चेहरा साफ करूनच झोपण्यास जावे.
- शरीर हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- चेहऱ्यावर आलेले मुरुमाचे फोड नखांनी फोडू नयेत. कारण असे केल्यामुळे त्याठिकाणी खड्डे पडत असतात. त्यामुळे मुरुमाचे फोड नखांनी फोडणे टाळावे. मुरूम समस्येवरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अशाप्रकारे या लेखात चेहऱ्यावरील खड्डे घालवण्याचे उपाय सांगितले आहेत. हे उपाय उपयोगी पडण्यासाठी काही दिवस नियमितपणे ते उपाय करणे आवश्यक आहे. कारण चेहऱ्यावरील खड्डे हे एका दिवसात काही निघून जात नाहीत. यासाठी वरील उपाय नियमित केल्यास हळूहळू चेहऱ्यावरील खड्ड्यांचा आकार बारीक होऊन ही समस्या दूर होत असते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा –> चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about Acne scars & Large Pores home remedy in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.