Dr Satish Upalkar’s article about Face glow tips in Marathi.
चेहऱ्याचे सौंदर्य :
प्रत्येकाला आपण सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग खुलण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात.
मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते. आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे, कोणती क्रीम वापरावी असे अनेकांचे प्रश्न असतात.यासाठी याठिकाणी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय दिले आहेत त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास, चेहरा गोरा होण्यास मदत होईल.
चेहरा गोरा करण्यासाठी हे करा घरगुती उपाय – :
1) टोमॅटो आणि काकडी –
चेहऱ्याला चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त ठरते. यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काहीवेळ ठेवावे. यामुळे चेहरा गोरा व चमकदार होण्यास मदत होते.
2) बटाट्याचा किस –
बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी. हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे डागही निघून जाण्यास मदत होते. बटाट्यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्याही कमी होतात.
3) पपईचा गर –
पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते.
4) कोरपडीचा गर –
कोरफडीचा गर (अॅलोव्हेरा जेल) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते. अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
5) अंड्याचा पांढरा भाग –
अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते.
6) हळद आणि बेसन –
बेसन, हळद आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा. या फेस पॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात.
7) मसूर डाळ –
मसूरडाळीच्या दोन ते तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नारळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहरा सुंदर दिसण्यास मदत होते.
8) बेकिंग सोडा –
चेहऱ्यावरील ग्लो वाढविण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरतो. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावावी. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावर असणारे डाग कमी होऊन चेहरा गोरा होण्यास मदत होते.
9) मध –
चमचाभर मधात लिंबूरस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल. याशिवाय दररोज सकाळी अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर सुकू द्यावे. त्यानंतर अंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा. यामुळेही चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.
10) गुलाबजल –
कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर ठेऊन त्याद्वारे 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करावा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा तजेलदार बनतो.
चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठीचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Face glow tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).