Dr Satish Upalkar’s article about Teeth Whitening tips In Marathi.
पिवळे दात पांढरे करणे –
आपले दात पांढरे चमकदार असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. पिवळे दात असल्यास चारचौघात वावरताना अडचणी येऊ शकतात. काही घरगुती उपायांनी पिवळे दात सहजपणे पांढरे करता येतात. यासाठी या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी पिवळे दात पांढरे करण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
दात पिवळे पडण्याची कारणे –
अनेक कारणांमुळे दात पिवळे पडू शकतात. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- दातांची साफसफाई योग्यरित्या न केल्याने दात पिवळे पडतात,
- नियमित दात न घासणे,
- चुकीच्या पद्धतीने दात घासणे,
- दात किडणे,
- दातांवर प्लाक जमा झाल्यामुळे ते पिवळे दिसू शकतात,
- चहा-कॉफी किंवा सोडायुक्त कोल्ड्रिंक्स वारंवार पिण्यामुळे दात पिवळे होतात,
- तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने,
अशा अनेक कारणांनी दात पिवळे पडतात.
पिवळे दात पांढरे करण्याचे घरगुती उपाय –
- केळ्याची साल दातांना घासल्याने पिवळे दात पांढरे होण्यासाठी मदत होते.
- पिवळे दात पांढरे करण्यासाठी संत्र्याची साल दातांवर घासावी.
- दात पिवळे झाल्यास मोहरीचे तेल व मीठ एकत्र करून दातांवर घासावे.
- पिवळ्या दातांवर बेकिंग सोडा चोळल्यास दातांवरील डाग निघून जावून पिवळे दात पांढरे होतात.
- कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास किंवा पिवळ्या दातांवर कडुनिंबाची पाने चोळल्यास पिवळे दात पांढरे होतात.
- पिवळे दात पांढरे करण्यासाठी ऑईल पूलिंग करावे.
पिवळे दात पांढरे करण्यासाठी वर दिलेले 6 सोपे व सुरक्षित असे घरगुती उपाय खूप उपयोगी पडतात. यामुळे पिवळ्या दातांची समस्या निश्चितच दूर होण्यास मदत होईल.
ऑईल पूलिंग कसे करावे ..?
पिवळे दात पांढरे करण्यासाठी ऑईल पूलिंग करणे फायदेशीर ठरते. यासाठी ब्रश करण्यापूर्वी तोंडात एक चमचा खोबरेल तेल घेऊन ते तोंडाच्या आतील बाजूस फिरवत राहा. आणि 15 मिनिटांनी चूळ भरावी व ते तेल थुंकून टाका. यासाठी तीळ तेलाचा सुद्धा आपण वापर करू शकता.
दात पांढरे होण्यासाठी दातांची घ्यायची काळजी –
- दिवसातून दोनदा व्यवस्थित दात घासावेत.
- तोंडाची स्वच्छता ठेवावी.
- दात घासताना जीभही स्वच्छ करावी.
- जेवल्यानंतर चूळ भरायला विसरू नका. यासाठी माउथवॉशचा वापर करू शकता.
- स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षे, सफरचंद यासारखी फळे खावीत.
- आहारात दुग्धजन्य पदार्थ, विविध कडधान्ये यांचा समावेश असावा.
- गोड पदार्थ सतत खाणे टाळावे.
- वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
- सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
- तंबाखू, पानमसाला, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- डेंटिस्टकडून वर्षातून एकदा दातांची तपासणी करून घ्यावी.
अशी काळजी घेतल्यास दात पांढरे आणि निरोगीसुध्दा बनतील.
हे सुध्दा वाचा – दात दुखणे यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about Teeth Whitening tips In Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
सुटसुटीत माहिती व Good tips
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
अशीच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमचे YouTube channel देखील subscribe करा.
चॅनल लिंक – https://youtube.com/@HealthMarathiChannel