Dr Satish Upalkar’s article about Tomato Flu in Marathi.
टोमॅटो फ्लू म्हणजे काय? Tomato Flu in Marathi :
टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. टोमॅटो फ्लूची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
टोमॅटो फ्लूमध्ये ताप येणे, पुरळ उठणे, सांधे दुखणे, सांधे सुजणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे अशी लक्षणे असतात. सुरवातीला ताप येतो त्यानंतर घसा खवखवणे यासारखे त्रास होतात. ताप आल्यानंतर दोन-तीन दिवसानी शरीरावर लाल रंगाचे पुरळ येऊन फोड येतात. टोमॅटो फ्लू चे फोड प्रामुख्याने हात, पाय आणि तोंडात येत असतात.
टोमॅटो फ्लू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव देशाच्या काही भागात दिसून आलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून टोमॅटो फ्लू संबंधित एक नियमावली (Guideline) जारी करण्यात आली आहे. यामध्ये टोमॅटो फ्लूचा संसर्ग रोख रोखण्यासाठी आवश्यक असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
टोमॅटो फ्लूची लक्षणे – Tomato Flu symptoms in Marathi :
- भरपूर ताप येणे,
- अंगावर पुरळ उठणे,
- अंगावर टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड येणे,
- सांधेदुखी व सांधे सुजणे,
- घसा खवखवणे
- थकवा जाणवणे,
- अंग दुखणे,
- मळमळ व उलट्या,
- पोटात दुखणे, जुलाब होणे, अशी लक्षणे यात असतात.
तसेच उलट्या किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन देखील होऊ शकते.
टोमॅटो फ्लूची कारणे – Tomato Flu causes in Marathi :
टोमॅटो फ्लू हा व्हायरसपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. टोमॅटो फ्लूची कारणे अद्यापही अज्ञात आहेत. टोमॅटो फ्लू नेमका कशामुळे होतो यावर शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.
टोमॅटो फ्लू कसा होतो ..?
टोमॅटो फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. याची लागण संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्याला होत असते. टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याची कपडे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, खेळणी इत्यादितून याचा प्रसार होत असतो. त्यामुळे संक्रमित मुलांना अलग ठेवणे आवश्यक आहे कारण टोमॅटो फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरू शकतो.
टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीची घ्यावयाची काळजी –
- टोमॅटो फ्लूची ताप, पुरळ वैगेरे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी इतरांपासून 5-7 दिवस लांब राहणे आवश्यक आहे.
- संक्रमित मुलाला काही दिवस इतर मुलांमध्ये मिसळू देऊ नये.
- संक्रमित व्यक्तीच्या दररोजच्या वापराच्या वस्तू जसे कपडे, रुमाल, टॉवेल, ब्रश, खेळणी इत्यादी वस्तू इतरांनी वापरू नयेत.
- आजारी व्यक्तींनी घरी थांबून विश्रांती घ्यावी.
- शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी, तरल पदार्थ, फळांचा रस, दूध वैगेरे प्यावे.
- आजारी व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार द्यावा.
- आजारी व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता राखावी.
गरम पाण्याने नियमित अंघोळ केली पाहिजे. - सर्दी खोकला असल्यास रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रुमालाचा वापर करावा.
- त्वचेवरील फोड आणि पुरळ खाजवू नका.
टोमॅटो फ्लू पासून बचाव करण्यासाठी उपाययोजना –
- ताप येणे, पुरळ येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- आजारी व्यक्तींनी पुरेशी विश्रांती घ्यावी.
- ताप किंवा पुरळ आलेल्या व्यक्तीपासून दूर राहा.
- आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाताना पुरेशी काळजी घ्या.
- बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी, तरल पदार्थ, फळांचा रस वैगेरे प्यावे.
- त्वचेवरील फोड आणि पुरळ खाजवू नका.
- नियमित आंघोळ करा.
- वैयक्तिक तसेच परिसराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
टोमॅटो फ्लू उपचार – Tomato Flu treatments in Marathi :
टोमॅटो फ्लू हा काही गंभीर असा आजार नाही. काही दिवसात हा आजार आपोआप बरा होतो. लक्षणानुसर टोमॅटो फ्लूवर उपचार केले जातात. जसे ताप असल्यास त्यावर तापावरील पॅरासिटामॉल सारखे औषध दिले जाते. टोमॅटो फ्लू ची लागण झालेल्यानी पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी, तरल पदार्थ, फळांचा रस, दूध वैगेरे प्यावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – मंकीपॉक्स आजाराची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
3 SourcesIn this article information about Tomato Flu Symptoms, Causes, Treatments and Prevention tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.