घसा खवखवणे कारणे व घशात खवखव होणे यावर घरगुती उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Ghasa khavkhavne upay in Marathi, Itchy Throat Home Remedies in Marathi.

घसा खवखवणे :

वातावरण बदलामुळे विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घसा खवखव होण्याचा त्रास होत असतो. तसेच सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वीही घशात खवखवत असते. यासाठी घशाची खवखव दूर करण्यासाठीचे घरगुती उपाय खाली दिले आहेत.

घशात खवखवणे उपाय :

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या –
घसा खवखवत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घसा खवखवणे दूर होते.

आले आणि मध –
घसा खवखवत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात खवखवणे कमी होण्यास मदत होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कपभर पाण्यात आले घालून ते पाणी उकळावे. त्यानंतर त्या पाण्यात मध मिसळून ते मिश्रण पिल्यामुळेही घस्याच्या समस्या दूर होतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

खडी साखर आणि कात –
घशात खवखव होत असल्यास खडी साखर आणि विडे करताना वापरतात ती चिमूटभर कात जिभेवर ठेवून चघळावी. यामुळेही घशात खवखवणे दूर होते.

गरम द्रव्यपदार्थ प्यावे –
घशात खवखवत असल्यास काळी मिरी, आले, वेलदोडे, लवंग पाण्यात टाकून उकळावे. त्या उकळलेल्या पाण्यात चहापावडर घालून चहा करून गरम असतानाच प्यावा. गरम दुधात हळद घालून पिल्यानेही घशाला आराम मिळून खवखव कमी होते.

Throat irritation – Causes, Symptoms and Treatment in Marathi.