Posted inDiseases and Conditions

Gallstones: पित्ताशयात खडे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

पित्ताशयातील खडे (Gallstones) : अनेक लोकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली पित्ताशयाची पिशवी असते. या पित्ताशयात पित्त (Bile) साठवले जाते. या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो.  पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. विशेषतः पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होत असतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात […]

Posted inDiseases and Conditions

Breast cancer: स्तनाचा कर्करोग लक्षणे, कारणे, निदान व उपचार

स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) : स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो. बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. […]

Posted inDiseases and Conditions

गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे लक्षणे व उपचार : Cervical cancer

गर्भाशय मुखाचा कर्करोग – Cervical Cancer : सर्वायकल कँसर हा स्त्रियांमधील सर्विक्स (Cervix) ह्या अवयवात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा […]

Posted inInfectious Diseases

Filariasis: हत्तीरोगाची कारणे, मुख्य लक्षणे व उपचार

हत्तीरोग आजार – Elephantiasis : हत्तीरोग हा परोपजीवी जंतूंमुळे होणारा साथीचा आजार आहे. याची लागण डासांमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. हत्तीरोग हा आजार lymphatic filariasis किंवा एलिफॅन्टीयसिस या नावानेही ओळखला जातो. हत्तीरोगाचा विपरीत परिणाम वृषण (पुरुषांचे जननेंद्रिय), पाय, मांडी, स्तन यावर होऊन त्याठिकाणी सूज येत असते. तसेच यामुळे पाय विद्रुप होऊन कायमचे अपंगत्व येत […]

Posted inDiseases and Conditions

Chickenpox: कांजिण्या ची मुख्य लक्षणे, कारणे आणि उपचार

कांजिण्या (Chickenpox) : कांजिण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आजारास Chicken Pox (चिकनपॉक्स) किंवा व्हॅरिसेला (varicella) या नावानेही ओळखले जाते. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या या रोगाची कारणे (Chickenpox causes) : कांजिण्या आजार हा Varicella-zoster व्हायरसमुळे होतो. […]

Posted inDiseases and Conditions

स्वाइन फ्लू ची मुख्य लक्षणे, कारणे व उपचार : Swine Flu Symptoms

स्वाइन फ्लू आजार – Swine Flu (H1N1) : स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून त्याची लागण ही H1N1 ह्या व्हायरसपासून होते. स्वाइन फ्लूची लक्षणे ही साधारण फ्ल्यू सारखीच म्हणजे सर्दी होणे, खोकला, ताप येणे अशी असतात. स्वाइन फ्लूचा व्हायरस हा डुकरांमधून माणसाकडे पसरला आहे. 2009 साली पहिल्यांदा स्वाइन फ्ल्यू हा आजार माहीत झाला. जागतिक […]

Posted inDiseases and Conditions

हिपॅटायटीस आजार होण्याची कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार

हिपॅटायटीस (Hepatitis) : हिपॅटायटीस हा यकृताचा एक महत्वाचा असा आजार आहे. या आजारात लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे (विषांणूद्वारा) पसरणारा आजार आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे यकृत संक्रमित होऊन त्याला सुज येते त्यामुळे यकृताची सामान्य कार्ये होण्यास अडथळा निर्माण होतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि इ असे पाच प्रकार आहेत. यकृताची कार्ये – यकृत […]