गर्भावस्था आणि पेरू –
पेरू हे स्वादिष्ट असे फळ असून यात फायबर, व्हिटॅमिन-C आणि फोलेट हे घटक मुबलक असतात. प्रेग्नंसी मध्ये पेरू खातात का, असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात पेरू खाणे हे सुरक्षित व आरोग्यासाठी फायदेशीर सुध्दा असते.
गरोदरपणात पेरू खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, लोह वाढण्यास मदत होते. पेरूतील फायबर्समुळे पोट साफ न होणे, छातीत जळजळ होणे, मूळव्याध अशा पचन संबधित समस्या दूर होतात. तसेच फायबरमुळे ब्लड शुगर आटोक्यात राहते. पेरूतील व्हिटॅमिन-A मुळे आई आणि गर्भाच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेरूतील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. गरोदरपणात पेरू खाण्याचे असे अनेक फायदे असतात.
गरोदरपणात पेरू खावा का?
गरोदरपणात पेरू खाणे हे सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. पेरू हे विविध पोषक तत्वांनी समृद्ध असते. पेरूमध्ये गर्भाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही पेरू निश्चितच खाऊ शकता. मात्र प्रेग्नंसीमध्ये कच्चा पेरू खाऊ नये. याकाळात केवळ पिकलेला पेरू खाल्ला पाहिजे.
गरोदरपणात पेरू खाण्याचे 6 फायदे –
1) व्हिटॅमिन-C मिळते ..
पेरूमध्ये व्हिटॅमिन-C भरपूर असते. व्हिटॅमिन-C हे बाळाच्या चांगल्या वाढीसाठी महत्वाचे असते. तसेच व्हिटॅमिन सी हे लोहाचे शोषण वाढविण्यास मदत करते. गरोदरपणात स्त्रीमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. त्यामुळे पेरू खाण्यामुळे लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन-C हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विविध रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.
2) फोलेट मिळते ..
पेरूमध्ये फोलेटचे प्रमाण सुध्दा मुबलक असते. गरोदरपणात पुरेशा प्रमाणात फोलेटचे सेवन केल्याने बाळात होणारे जन्मदोष टाळण्यास मदत होते.
3) फायबर मिळते ..
पेरूमध्ये फायबर सुध्दा भरपूर प्रमाणात असते. यामुळे पचन संबधित पोट साफ न होणे, छातीत जळजळ होणे अशा समस्या दूर होतात. गरोदरपणात स्त्रियांना पोट साफ न होण्याची समस्या होत असते. अशावेळी पेरू खाणे फायदेशीर असते.
4) रक्तदाब नियंत्रित राहतो ..
गर्भधारणेदरम्यान अनेक स्त्रियांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. पेरूमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पेरू खाण्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या अधिक होत असते. यामुळे प्रीक्लॅम्पसिया सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी रक्तदाब आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. अशावेळी पेरू खाणे फायदेशीर असते.
5) रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते ..
पेरूमध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिस पासून दूर राहण्यास पेरू खाल्ल्याने मदत होऊ शकते.
6) डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते ..
पेरूमध्ये व्हिटॅमिन-A सुध्दा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आई आणि गर्भ दोघांची दृष्टी सुधारते तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पेरू खाण्यामुळे मदत होते.
प्रेग्नंसी मध्ये पेरू खाताना घ्यायची काळजी –
- पेरू खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून व कापून पेरू खावा. त्यामुळे रोगजंतू पोटात जात नाहीत.
- गरोदरपणात पिकलेला पेरू खावा.
- गरोदरपणात कच्चा किंवा अर्धवट पिकलेला पेरू खाणे टाळावे.
- गरोदरपणात अधिक प्रमाणात पेरू खाऊ नये. कधीतरीच एखादा पेरू खाऊ शकता.
- पेरुला मीठ लावून खाऊ नका. मीठामुळे रक्तदाब वाढत असतो.
- तसेच मुख्य म्हणजे, गरोदरपणात पेरू खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
हे सुध्दा वाचा – गरोदरपणात काय खावे व काय खाऊ नये याची माहिती जाणून घ्या.
Read Marathi language article about Should You Eat Guava During Pregnancy?. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.