लघवी साफ न होणे –
आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे लघवीतून बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातून दररोज किमान 400 ml लघवी बाहेर गेली पाहिजे. मात्र बऱ्याचजणांना लघवीला साफ होत नाही.

लघवीला साफ न होण्याची कारणे –
पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी सूजणे, वेदनाशामक औषधे घेणे अशा विविध कारणांमुळे देखील लघवीला साफ होत नाही.

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय –
लघवी साफ होत नसल्यास पुरेसे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिण्यामुळे लघवीला साफ होते. पाण्याशिवाय शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस, उसाचा रस, सरबत असे द्रवपदार्थ देखील प्यावेत. यामुळे लघवीला साफ होण्यास मदत होते.

लघवी साफ होण्यासाठी कुळथाचे कढण खावे. आहारात कुळथाचे कढण समाविष्ट केल्यास लघवी साफ होण्यास मदत होते.

लघवीला साफ होण्यासाठी व्हिटॅमिन-C असणारी फळे खावीत. यासाठी संत्री, मोसंबी, आवळा, किवी अशी फळे खावीत. हे उपाय केल्यास लघवीला साफ होण्यासाठी मदत होते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
लघवीला कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. लघवीला कमी होण्याबरोबरच जर ताप येणे, मळमळ व उलट्या होणे, लघवीला जळजळ होणे, लघवीला उग्र वास येणे, ओटीपोटात अतिशय दुखू लागणे, पायावर सूज येणे, चक्कर येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा – किडनी खराब होण्याची कारणे, लक्षणे व उपचार याची माहिती जाणून घ्या..

Read Marathi language article about Low urine output causes and treatments. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

1 Comment

  1. लघवी होताना खूप जोर द्यावा लागतो व दिल्यानंतर हळू हळू संथ गतीने होते व वेळ ही लागतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *