संडासच्या जागी जळजळ होणे –

बऱ्याचदा संडासच्या जागी जळजळ होऊ लागते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होत असतो.

संडासच्या जागी जळजळ होण्याची कारणे –

  • तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते.
  • तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडासच्या जागी जळजळ होऊ शकते.
  • गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे जळजळ होत असते.

संडासच्या जागी जळजळ होणे यावर उपाय –

  • संडासच्या जागेवर जळजळ होत असल्यास केळे खावे.
  • संडास जागी जळजळ होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात चमचाभर साजूक तूप घालून ते पाणी प्यावे.
  • पोट साफ होत नसल्यास व त्यामुळे संडासच्या जागी जळजळ होत असल्यास झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.
  • गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने गुदभागी जळजळ होत असल्यास तेथे अँटीबायोटिक क्रीम लावावी.

संडास जागी जळजळ होत असल्यास काय करावे..?

  • अशावेळी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
  • दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  • चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
  • तंबाखू, स्मोकिंग, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
  • पोटात जंत झाले असल्यास डॉक्टरांकडून जंतनाशक गोळी घ्यावी.

अशी काळजी यावेळी घेतली पाहिजे.

हे सुध्दा वाचा – संडासच्या जागी खाज येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Burning Anus problem causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *