संडास जागी खाज येणे –
अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते. संडासच्या जागी स्वच्छता न ठेवल्याने हा त्रास प्रामुख्याने होत असतो. याशिवाय पोटातील जंत, मूळव्याध यामुळेही संडास जागी खाज सुटत असते.

संडास जागी खाज येण्याची कारणे –

  • अनेक कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते.
  • मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, अतिसार, सोरायसिस, जंत-कृमी अशा कारणांनी संडासच्या जागी खाज सुटते.
  • संडासच्या जागी स्वच्छता न राखण्यामुळे देखील तेथे खाज सुटत असते.
  • काहीवेळा टॉयलेट पेपर किंवा साबणाच्या ॲलर्जीमुळेही तेथे खाज सुटत असते.

संडासच्या जागी खाज येणे यावर उपाय –
संडासच्या जागी खाज सुटत असल्यास तेथे अँटीबायोटिक पावडर किंवा क्रीम लावावी.

संडासच्या जागी खाज येत असल्यास तेथे खोबरेल तेल लावा.

संडासच्या जागी खाज येत असल्यास तेथे एलोवेरा जेल लावा.

बद्धकोष्ठतेमुळे गुदभागी खाज सुटत असल्यास, एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे.

जंत व कृमीमुळे संडासच्या जागी खाज येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतनाशक औषध घ्यावी. हे उपाय संडासच्या जागेवर खाज येणे यावर उपयोगी पडतात.

संडासच्या जागेवर खाज येत असल्यास घ्यायची काळजी –

  • शौचानंतर संडासची जागा स्वच्छ करावी.
  • सुती व सैल अंडरवेअर घाला.
  • संडासच्या जागी अधिक खाजवणे टाळा. कारण तेथे नखे लागून जखमा व इन्फेक्शन होऊ शकते.
  • नखे लागून जखम होऊ नये यासाठी नखे वेळच्यावेळी कमी करा.

हे सुध्दा वाचा – मूळव्याध होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..

Read Marathi language article about Itchy anus Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

4 Comments

  1. इन्फेक्शन मुळे हा त्रास प्रामुख्याने होतो. Article मध्ये सांगितलेले उपचार करा. त्रास कमी होईल.

  2. मूळव्याध आहे व त्यामुळे संडास जागी खाज येते उपाय सांगा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *