Burning Anus causes and treatments in Marathi.

संडासच्या जागी आग होणे याची कारणे व उपाय article by Dr Satish Upalkar

संडासच्या जागेवर आग होणे –
तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी आग होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडास करताना आग होऊ लागते. गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे आग होत असते.

संडासच्या जागी आग होणे यावर उपाय :
संडासच्या जागी आग होत असल्यास केळे खावे. यामुळे होणारी आग कमी होते.

संडासच्या जागेवर आग होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात चमचाभर साजूक तूप घालून ते पाणी प्यावे.

पोट साफ न झाल्याने बद्धकोष्ठतेमुळे संडास जागी आग होत असेल तर झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.

तसेच जर गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने आग होत असल्यास तेथे अँटीबायोटिक क्रीम लावावी.

संडास जागी आग होत असल्यास काय करावे..?

  • अशावेळी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
  • दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  • चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
  • तंबाखू, स्मोकिंग, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
  • पोटात जंत झाले असल्यास डॉक्टरांकडून जंतनाशक गोळी घ्यावी. अशी काळजी यावेळी घेतली पाहिजे.
[adinserter block=”5″]

हे सुध्दा वाचा – संडास जागी खाज सुटण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..

In this article information about Burning Anus Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *