Bembi sarkane causes and treatments in Marathi.

Bembi sarkane upay in Marathi article by Dr Satish Upalkar.

बेंबी सरकणे –
वजनदार वस्तू उचलणे किंवा अवजड कामे करणे यामुळे काहीवेळा बेंबी आपल्या जागेवरून थोडी सरकते. बेंबी सरकल्यामुळे पोटात जोरात दुखू लागते. यात पुढे वाकताना, वस्तू उचलताना त्रास होऊ लागतो.

बेंबी सरकल्यामुळे होणारे त्रास –
बेंबी सरकल्यामुळे पुढे वाकताना, वस्तू उचलताना पोट दुखू लागते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता होणे, संडासला लागणे, उलटी किंवा मळमळ होणे, महिलांमध्ये मासिक पाळीत अधिक पोट दुखणे असे त्रास होऊ शकतात.

बेंबी सरकणे यावर उपाय –
बेंबी सरकल्यावर उपाशीपोटी मोहरीच्या तेलाचे काही थेंब बेंबीत घालावे. हा घरगुती उपाय 3 ते 4 दिवस करावा.

बेंबी सरकली असल्यास बेंबीच्या ठिकाणी एरंडेल तेल लावावे. व बेंबीच्या भोवताली हळुवार मालिश करावी.

बेंबी सरकल्यावर उपाशीपोटी 10 ग्रॅम बडीशेप व 20 ग्रॅम गूळ एकत्र बारीक करून खावे. बेंबी सरकणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.

बेंबी सरकल्यास घ्यायची काळजी –
काही दिवस जड वस्तू उचलणे टाळावे. तसेच घरगुती उपाय करूनही पोटातील वेदना कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जावे.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे जाणून घ्या..

In this article information about Bembi sarkane Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *