Back Sprains causes and treatments in Marathi.
पाठीत लचक भरणे –
काही कारणांनी पाठीतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यूमध्ये अचानकपणे ताण पडल्याने हा त्रास होतो. पाठीत लचक भरल्यास तेथे अतिशय दुखू लागते. यावेळी पाठ वळवताना जास्त दुखत असते.
पाठीत लचक भरणे याची कारणे –
बऱ्याचदा खाली वाकताना किंवा जड वस्तू उचलताना पाठीतील मांसपेशी ताणल्या जातात. त्यामुळे पाठीत लचक भरते. तसेच सतत खुर्चीत बसून काम करण्याची सवय, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवघडून झोपणे अशा विविध कारणांनी पाठीत लचक भरू शकते.
पाठीत लचक भरणे यावर घरगुती उपाय –
पाठीत लचक भरल्यास पाठीला थंड किंवा गरम शेक द्यावा. यामुळे पाठीच्या मांसपेशी सैल होऊन तेथील सूज व वेदना कमी होतात. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून किंवा गरम पाण्याच्या पिशवीने पाठीला शेक द्यावा.
पाठीत लचक भरल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळेही आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
पाठीत लचक भरल्यास आयुर्वेदिक वेदनाहर तेलाने पाठीला मसाज करावा. यासाठी महानारायण तेल, निर्गुंडी तेल या आयुर्वेदिक तेलांचा वापर करू शकता.
पाठीत लचक भरणे यावरील वेदनाशामक जेल –
पाठीत लचक भरल्यास तेथे वेदनाशामक जेल लावू शकता. यामुळे तेथील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच लचकलेले मांसपेशीही यामुळे शिथिल होतात. यासाठी Moov, Volini Fast relief, iodex अशी pain relief जेल वापरता येईल.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – सायटिकाची कारणे, लक्षणे व उपचार माहिती जाणून घ्या..
In this article information about Back Sprains Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.