Leg cramps Causes and home remedies in Marathi.
पायात वात येणे –
बऱ्याचजणांना पायात वात येण्याची समस्या वरचेवर होते. पायात वात आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो.
पायात वात येण्याची कारणे –
- पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे पायात वात येत असतो.
- शरीरात पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असल्यास त्यामुळेही पायात वात येत असतो.
- याशिवाय अतिश्रम किंवा जास्त व्यायामामुळे पायाचे स्नायू थकल्यामुळे पायात वात येऊ शकतो.
पायाला वात येणे यावरील घरगुती उपाय –
पायात वात आल्यावर कोमट केलेले निर्गुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावावे व तेथे थोडी मालीश करावी.
पायाला वात आल्यास तेथे खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करावी.
पायात वात आल्यास तेथे गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा.
पायाला वात आल्यावर पाय लांब करून पायाचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा.
पायात वात येऊ नये यासाठी काय करावे ..?
- पुरेसे पाणी प्यावे. यासाठी दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, रसदार फळे, सरबत असे द्रवपदार्थ देखील प्यावेत.
- आहारात दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा सामावेश करावा.
- पायाला वरचेवर वात येत असल्यास दररोज एक केळे जरूर खावे.
- नियमित व्यायाम करावा. यामुळे पायाच्या मांसपेशीतील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच स्नायूंवरील ताणही कमी होण्यास मदत होते.
अशी काळजी घेतल्यास पायात वात येत नाही.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – पायाला भेगा पडणे यावरील उपाय जाणून घ्या..
In this article information about Leg cramps Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.
Beneficial info
Thanks for your feedback