Ayurvedic medicine for Low urine output in Marathi.
लघवीला साफ न होणे –
आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. दररोज किमान 400 ml लघवी शरीराबाहेर गेली पाहिजे. मात्र काहीवेळा लघवीला साफ होत नाही. याची विविध कारणे असू शकतात.
लघवी कशामुळे साफ होत नाही ..?
पाणी कमी पिण्याची सवय असल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीला साफ होत नाही. तसेच मूतखडा, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, किडनीचे आजार, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी सूजणे, वेदनाशामक औषधे घेणे अशा विविध कारणांमुळे देखील लघवीला साफ होत नाही.
लघवी साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध –
लघवीला साफ होण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपयुक्त औषधे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने गोक्षुर चूर्ण, गोक्षुरादी गुग्गुल, पूनर्नवासव यासारखी मुत्रल (Diuretics) औषधे लघवी साफ होण्यासाठी उपयोगी पडतात.
लघवी साफ होण्यासाठी उपाय –
- लघवी कमी होत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिण्यामुळे लघवीला साफ होते.
- शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस, उसाचा रस, सरबत असे द्रवपदार्थ पिण्यामुळे देखील लघवीला साफ होण्यास मदत होते.
- कुळथाचे कढण आहारात समाविष्ट केल्यास लघवी साफ होते.
- लघवी साफ होण्यासाठी व्हिटॅमिन-C युक्त पदार्थ खावेत. यासाठी संत्री, मोसंबी, आवळा, किवी अशी फळे खावीत. हे उपाय केल्यास लघवीला साफ होण्यासाठी मदत होते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?
लघवीला कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. लघवीला कमी होण्याबरोबरच जर ताप येणे, मळमळ व उलट्या होणे, लघवीला जळजळ होणे, ओटीपोटात अतिशय दुखू लागणे, पायावर सूज येणे, चक्कर येणे असे त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – किडनी खराब होण्याची लक्षणे जाणून घ्या..
In this article information about Ayurvedic medicine for Low urine output in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.
उपयुक्त उपाय thanks
Thanks