मोसंबी (Sweet Lime) –

मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात.

मोसंबी हे एक पौष्टिक फळ आहे जे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मोसंबी खाल्याने पित्ताशयाचे आजार दूर राहतात, मधुमेह आणि हृदयरोग टाळता येतात, वजन कमी होते, पचन क्रिया सुधारते आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

मोसंबी खाण्याचे 8 आरोग्यदायक फायदे –

1) मोसंबी कॅन्सरचा धोका कमी करते.
फ्री रॅडिकल्स हे शरीराच्या पेशींमध्ये नुकसान करू शकतात आणि कर्करोग, हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका वाढवू शकतात. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देते. त्यामुळे कर्करोग, हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.

2) मोसंबी स्कर्वीला प्रतिबंध करते.
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते जे स्कर्वीचा प्रतिबंध करते. स्कर्वी हा एक आजार आहे जो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. स्कर्वीच्या लक्षणांमध्ये थकवा, जखम बरे न होणे, हिरड्या दुखणे आणि दातातून रक्तस्त्राव होणे यांचा समावेश आहे.

3) मोसंबी खाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते जे प्रतिरक्षा प्रणालीला मजबूत करते. मजबूत प्रतिरक्षा प्रणाली शरीराला संसर्गापासून संरक्षण देते.

4) मोसंबी खाल्याने पचन क्रिया सुधारते.
मोसंबीमध्ये फायबर भरपूर असते जे पचन क्रिया सुधारते. फायबर हा एक पौष्टिक तत्व आहे जो पचन तंत्रात पाणी शोषून घेण्यास मदत करतो आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी यांसारख्या पचन समस्यांपासून बचाव करते.

5) मोसंबी खाल्याने पित्ताशयाचे आजार दूर राहतात.
मोसंबी पित्ताशयाचे आजार टाळण्यास मदत करू शकते. मोसंबीमध्ये लिमोनोइड्स अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे पित्ताशयाच्या आजारांपासून संरक्षण होते.

6) मोसंबी मधुमेह आणि हृदयरोगाला दूर ठेवते.
मोसंबीमध्ये उपयुक्त अँटिऑक्सिडेंट, फायबर आणि पोटॅशियम यांचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. यात असणाऱ्या फायबरमुळे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. तर पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहिल्याने हृदयरोग, पक्षाघात असे गंभीर आजार दूर राहतात.

7) मोसंबी वजन कमी करते.
मोसंबीमध्ये फायबर आणि पाणी भरपूर असते जे वजन कमी करण्यास मदत करतात. फायबर घटकामुळे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे भूक कमी लागते. तर पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

8) मोसंबी मांसपेशीतील क्रॅम्प्स कमी करते.
मोसंबीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियममुळे मसल क्रॅम्प्स कमी होतात. त्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या असल्यास मोसंबी जरूर खावे.

मोसंबी खाण्याचे तोटे –

मोसंबी हे आरोग्यदायी फळ आहे, परंतु जास्त प्रमाणात मोसंबी खाल्ल्याने काही त्रास होऊ शकतात. मोसंबीमध्ये सायट्रेट हा घटक असतो जो पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकतो. मोसंबी जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. पित्त वाढू शकते तसेच काही जणांना मोसंबी खाल्ल्यानंतर ॲलर्जीचा त्रास देखील होऊ शकतो.

मोसंबी कोणी खाऊ नये?
ज्यांना मोसंबी खाल्यावर ॲलर्जीचा त्रास होतो त्यांनी मोसंबी खाणे टाळावे. तसेच ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, किडनीचे आजार आहेत, ज्यांना दमा आहे किंवा ज्यांना हृदयरोग आहे अशा लोकांनी मोसंबी खाऊ नये. डायबेटिस असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं मोसांबी खावे. कारण मोसंबीमध्ये साखर देखील असते, त्यामुळे जास्त खाणे टाळावे.

मोसंबी बरोबर काही औषधे खाल्ल्याने त्या औषधांचे दुष्परिणाम वाढू शकतात. यासाठी तुम्ही जर ब्लड थिनर करणारी औषधे, हृदयरोगाची औषधे, डायबेटिसची औषधे किंवा कर्करोगाची औषधे घेत असाल तर मोसंबी खाणे टाळा.

Read Marathi language article about Mosambi or Sweet lime health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *