गरोदरपणात फणस खातात का?
गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता.
फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात. हे सर्व पोषकघटक गर्भवती महिलांच्या आणि बाळांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
गरोदरपणात फणस खाण्याचे 7 प्रमुख फायदे –
1) फणस खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
2) गर्भधारणेदरम्यान फणस खाल्याने वजन वाढण्यास मदत होते.
3) फणस खाल्याने गर्भाशयाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
4) फणस खाल्यामुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा सुधारतो.
5) गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.
6) गर्भाच्या मेंदू आणि स्नायूंच्या विकासास मदत होते.
7) गरोदरपणात फणस खाल्याने आई व गर्भाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गरोदरपणात फणस खाताना घ्यायची काळजी –
- गरोदरपणात कच्चा किंवा अर्धवट पिकलेला फणस खाऊ नका.
- पावसाळ्याच्या दिवसात फणस खाऊ नका.
- गरोदरपणात जास्त प्रमाणात फणस खाऊ नका. केवळ दोन ते तीनच गरे खावीत.
- जर तुम्हाला फणस खाल्ल्यानंतर कोणतेही त्रास होत असेल तर फणस खाणे थांबवा.
गरोदरपणात जास्त फणस खाल्ल्यास होणारे त्रास –
जास्त प्रमाणात फणस खाल्याने पोटदुखी, मळमळ होणे, उलट्या होणे, जुलाब लागणे, बद्धकोष्ठता, ऍसिडीटी, त्वचेवर पुरळ उठणे, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात. त्रास होत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi language article about Should You Eat Jackfruit During Pregnancy?. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.