Armpit lump causes, symptoms and treatments in Marathi.
काखेत गाठ येणे – Armpit lump :
काखेत गाठ असणे ही एक सामान्य समस्या असून स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध कारणांमुळे काखेत गाठी होतात. काखेतील गाठ ही लहान किंवा गोल्फ बॉलसारखी मोठी असू शकते. काखेतील गाठी ह्या सामान्यतः स्वतःहून निघून जातात. काखेत गाठ होणे याला वैद्यकीय भाषेत Armpit lump असे म्हणतात. काखेत गाठ कशामुळे येते, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय याची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
काखेत गाठ कशामुळे येते..?
काखेत गाठ येणे याची कारणे अनेक असतात.
- बॅक्टेरियल, व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे काखेत गाठ येते.
- काखेत घाम अधिक येत असतो. अशावेळी काखेतील स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर काखेत गाठ येऊ शकते.
- रेझरने वॅक्सिंग केल्यानंतरही काखेत गाठ येऊ शकते.
- काखेतील सिस्टमुळे तेथे पू धरल्यास काखेत गाठ येऊ शकते.
- काखेत जास्त प्रमाणात परफ्यूम किंवा डियो वापरल्यास त्याच्या एलर्जीमुळेही काखेत गाठ येऊ शकते.
- चरबीच्या गाठी म्हणजेच लिम्फोमामुळेही काखेत गाठ होऊ शकते.
- याशिवाय स्तनाचा कर्करोग, ल्युकेमिया यासारख्या गंभीर कारणांमुळेही काखेत गाठ होऊ शकते.
काखेतील गाठ आणि जाणवणारी लक्षणे –
काखेत लहान किंवा मोठी गाठ आल्यासारखे जाणवणे.
काखेत असणाऱ्या गाठीच्या ठिकाणी सूज येऊन वेदना होणे. इन्फेक्शन झाल्याने काखेत गाठ आली असल्यास तेथे पू धरतो तसेच यामुळे ताप येऊ शकतो. अशी लक्षणे काखेत गाठ आल्यावर जाणवतात.
काखेतील गाठी वर उपचार –
काखेतील गाठ ही आपोआप काही दिवसात बरी होत असते. मात्र काखेतील गाठी वाढत आसल्यास किंवा गाठ मोठ्या आकाराची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्रासाचे निदान करून उपचार घेणे आवश्यक आहे. यावेळी निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी CBC चाचणी, बायोप्सी, मॅमोग्राम, MRI किंवा CT scan, एलर्जी टेस्ट इत्यादी काही चाचण्या केल्या जाऊ शकतात.
काखेत आलेली गाठ जास्त दुखत असेल किंवा त्यात पू भरला असल्यास डॉक्टरांकडे जावे. यावेळी डॉक्टर हे अँटी-बॅक्टेरियल व वेदनाशामक औषधे देतील.
चरबीची गाठ असल्यास शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकली जाते. तर कर्करोगामुळे काखेत गाठ आली असल्यास त्यावर शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी याद्वारे उपचार केले जातात.
काखेत गाठ येणे यावर उपाय –
काखेतील गाठ दुखत असल्यास तेथे बर्फाने शेक द्यावा.
काखेत गाठ आल्यास तेथे कोरफडीचे जेल लावावा. कोरफड मध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे या घरगुती उपाय केल्यास काखेतील गाठ कमी होण्यास मदत होते.
काखेतील गाठ घालवण्यासाठी तेथे हळदीचा लेप लावावा. हळदीत अँटी-बॅक्टेरियल व सूज कमी करणारे आयुर्वेदिक घटक असतात. यामुळे या उपायाने काखेतील गाठ कमी होते.
काखेत गाठ आल्यास तेथे कडुलिंबाची पेस्ट लावावी. कडुनिंबातही अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळेही काखेतील गाठ कमी होऊन आराम मिळतो. काखेत गाठ येणे यावर असे घरगुती उपाय आपण करू शकता.
काखेची घ्यायची काळजी –
- काखेतील भागाची स्वच्छता ठेवावी. कारण काखेत घाम अधिक येत असतो. अशावेळी तेथे इन्फेक्शन होऊ नये यासाठी तेथील स्वच्छतेची काळजी घ्यावी.
- आंघोळ करताना सौम्य साबणाने काखेतील भाग स्वच्छ धुवावा.
- उन्हाळ्याच्या दिवसात घाम शोषणारी कॉटनची कपडे वापरावीत.
- काखेत ज्यादा परफ्यूम किंवा डियोचा वापर करू नये. कारण यातील केमिकलची एलर्जी होऊन काखेत गाठ येऊ शकते.
हे सुध्दा वाचा – कॅन्सरची गाठ कशी ओळखावी ते जाणून घ्या..
In this article information about Armpit lump Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.