Dr Satish Upalkar’s article about Health benefits of Ivy gourd in Marathi.
तोंडली – Ivy gourd :
तोंडलीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तोंडली मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स, खनिजे, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तोंडलीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी तोंडली खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान याविषयी माहिती सांगितली आहे.
तोंडली खाण्याचे फायदे –
तोंडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तोंडली भाजी खाण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तोंडलीमध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन आटोक्यात राहते. कच्ची तोंडली खाल्ल्याने तोंडातील अल्सरचे फोड कमी होतात. असे अनेक फायदे तोंडली खाण्यामुळे होतात.
1) तोंडातील अल्सरवर तोंडली खाणे फायदेशीर असते.
तोंड आल्यास तोंडात फोड येऊन जखम होत असते. तोंड येणे या त्रासात कच्ची तोंडली खाणे फायदेशीर असते. यामुळे तोंडातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
2) तोंडली खाल्ल्याने वजन कमी होते.
तोंडली मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. तसेच तोंडली खाल्ल्याने भुक नियंत्रित होत असते. त्यामुळे तोंडली खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
3) तोंडली भाजी खाण्यामुळे पोट साफ होते.
तोंडलीत भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असते. त्यामुळे नियमित पोट साफ होण्यास यामुळे मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी तोंडलीची भाजी जरूर खावी.
4) तोंडलीची भाजी ही मधुमेहाला दूर ठेवते.
तोंडलीमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण असते. यामुळे तोंडली खाल्याने रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात राहण्यास मदत होत असते. पर्यायाने मधुमेहापासून दूर राहता येते.
5) डोळ्यांच्या आरोग्यासाठी तोंडली खाणे चांगले असते.
व्हिटॅमिन-A हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तोंडलीमध्ये व्हिटॅमिन-A चे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी यामुळे मदत होते.
तोंडली खाण्याचे तोटे व नुकसान –
तोंडली जास्त प्रमाणात खाल्यास पोट बिघडू शकते. यामुळे पोट दुखणे, मळमळ होणे, अपचन होणे, अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात.
तोंडली कोणी खाऊ नये..?
- तोंडलीची ऍलर्जी असणाऱ्यांनी तोंडली खाणे टाळावे.
- गरोदर स्त्रियांनी तोंडली खाऊ नये. कारण यामुळे पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
- मधुमेही रुग्णांनी तोंडली भाजीचा आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण यामुळे एकाएकी ब्लड शुगर कमी होऊ शकते.
- तोंडलीत पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी तोंडली खाणे टाळावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – कारले खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..
In this article information about Health benefits and Side effects of Eating Ivy gourd in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).