Bad smell in Nose Home remedies in Marathi.

नाकातून घाण वास येणे –

तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे.

नाकातून घाण वास येण्याची कारणे –

  • नाकाची योग्यरित्या स्वच्छता न ठेवल्याने नाकातून घाण वास येऊ लागतो.
  • सर्दी होणे, सायनुसायटिस (Sinusitis) ची समस्या असल्यास त्यामुळे नाकातून घाण वास येऊ लागतो.
  • तोंडाची स्वच्छता न ठेवल्याने दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे कण सडतात त्यामुळे तोंडात घाण वास येऊ लागतो व तेथील दुर्गंधी नाकावाटे येऊ शकते.
  • तंबाखू, धूम्रपान अशा व्यसनामुळेही नाकातून घाण वास येऊ लागतो.
  • कांदा, लसूण यासारखे पदार्थ खाण्यात आल्यास नाकातून वास येऊ शकतो.

नाकातून वास येणे यावरील उपाय –

  • नाकातून वास येत असल्यास आंघोळीच्या वेळी आपले नाक साफ व स्वच्छ करावे.
  • नाकातून वास येत असल्यास गरम पाण्यात थोडे मीठ व बेकिंग सोडा घालून त्या पाण्याने आपले नाक स्वच्छ करावे.
  • नाकातून वास येत असल्यास दिवसातून दोनदा व्यवस्थित दात घासावेत.
  • नाकातून वास येत असल्यास रोज गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
  • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. यामुळे नाकातील शेंबूड घट्ट होत नाही. हे उपाय नाकातून वास येणे या समस्येवर उपयोगी पडतात.
Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – तोंडातून वास येणे यावरील उपाय जाणून घ्या..

In this article information about Bad smell in Nose Causes and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Leave a comment

Your email address will not be published.