Dr Satish Upalkar’s article about Ear Boils home remedies in Marathi.

कानात फोड येणे –

काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या लेखात सांगितली आहे.

कानात फोड येण्याची कारणे –

पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत असतो. तर पिंपल्स मुळे देखील कानात फोड येतो. कानात आलेला फोड हा सूजयुक्त व दुखणारा असतो.

कानात फोड येणे यावर उपाय –

  • कानात फोड आल्यास तेथे चंदन व हळदीचा लेप लावावा.
  • एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात थोडा लिंबूरस व पाणी घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट फोडवर लावावी.
  • कानातील फोड घालवण्यासाठी तेथे कोरफड जेल लावावा.

कानात फोड येणे यावरील उपचार –

  • कानातील फोडवर अँटी-बॅक्टेरियल क्रीम देखील लावू शकता.
  • कानात फोड आलेल्या ठिकाणी वेदना होत असल्यास व त्यामुळे अंग दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळी घेऊ शकता.
Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – कान दुखणे यावरील घरगुती उपाय जाणून घ्या..

In this article information about Boils on Ear Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Leave a comment

Your email address will not be published.