कान दुखीची कारणे व कान दुखीवर घरगुती उपाय (Kan dukhane in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Ear pain in Marathi, kan dukhane upay in marathi, kan dukhi upay, kan dukhane gharguti upay in Marathi.

कान दुखणे :

कानदुखीचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये कानदुखी अधिक प्रमाणात होत असते. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे, सर्दी झाल्यामुळे, कानात मळ अधिक झाल्याने कानदुखी होऊ शकते.

कान दुखी कारणे :

• कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
• सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे,
• हिरड्या सुजल्यामुळे,
• कानात मळ अधिक झाल्याने,
• कानाचा पडदा फाटल्यामुळे,
• कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे,
• कानात इंज्यूरी किंवा मार लागल्याने कानदुखी होऊ शकते.

कान दुखणे घरगुती उपाय :

लसूण –
दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात गरम कराव्यात. थंड झाल्यावर तेल गाळून घ्यावे. ह्या तेलावंगे 2-3 ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात घालावे. यामुळे कानदुखी थांबण्यास मदत होईल. याशिवाय आपण लसूण रसाचे काही थेंबही दुखणाऱ्या कानात घालू शकता.

कांदा –
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. कांदा थोडा गरम करून त्याचा चमचाभर रस काढावा. या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कानदुखी दूर होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आले –
कांदा आणि लसूण प्रमाणेच आलेही कानदुखीवर उपयोगी ठरते. आल्याच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स कानात दिवसातून 3 वेळा घातल्यास कानदुखी दूर होते.

तुळशीची पाने –
तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून 2 वेळा कानात टाकावे. यामुळेही कान दुखणे थांबते.

Home remedies for ear pain in Marathi, Earache: Causes, Symptoms and Treatment in Marathi information.