तोंडाला दुर्गंधी येणे – Bad Breath in Marathi :

तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे.

तोंडाला घाण वास येण्याची कारणे – Causes of Breath odor :

प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यामुळे ही समस्या होत असते. कारण तोंडाची स्वच्छता न ठेवल्यास अन्नाचे कण दातांच्या फटीत अडकून राहतात व तेथेच ते बॅक्टेरियामुळे सडतात. त्यामुळे तोंडातून घाण वास येऊ लागतो. याशिवाय खालील काही कारणांमुळेही मुखदुर्गंधी होऊ शकते.

मुख दुर्गंधी येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

  1. दात व्यवस्थित घासावेत.
  2. दात घासताना आपल्या तोंडाची,
  3. जिभेची स्वच्छता करावी. यासाठी टंग क्लीनरचा वापर करावा.
  4. कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
  5. रात्री झोपण्यापूर्वीही दात घासावेत.
  6. धूम्रपान, तंबाखू, गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
  7. वारंवार चहा, कॉफी पिणे टाळावे.

तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय :

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी थोडे धने तोंडात ठेवून चावत राहावेत. यामुळे तोंडातून येणारा घाण वास कमी होण्यास मदत होते. याप्रमाणेच मुख दुर्गंधीसाठी उपाय म्हणून आपण लवंग, वेलची किंवा बडीशेपसुद्धा चावून खाऊ शकता. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतात.

तसेच तुळशीची काही पाने किंवा पेरूची पाने चावत राहिल्यामुळेही मुखदुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होते. मुख दुर्गंधीवर वरील सर्व आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी असतात.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
तोंडाला चव येण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...