ओठावर जर येण्याची कारणे –

अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते.

ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय –

  • ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे.
  • ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही प्रमाणात आराम मिळतो.
  • तोंडाला जर आल्यावर जिरेपूड मधात मिसळून ती ओठांना लावावी.

ओठाला जर येणे यावर हे घरगुती उपाय उपयोगी पडतात.

ओठाला जर आल्यास काय खाऊ नये ..?

  • तोंडाला जर आल्यावर तिखट, मसालेदार, आंबट व खारट पदार्थ खाणे टाळावे.
  • जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
  • चहा, कॉफी वारंवार पिणे टाळावे.
  • तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी व्यसने टाळा.

तोंडाला जर आल्यावर काय करावे ..?

  • अन्न सावकाश चावून खावे.
  • तोंडाची स्वच्छता ठेवा.
  • रोजच्या रोज दात घासावेत.
  • दात घासण्यासाठी मऊ ब्रीसल्स असणाऱ्या ब्रशचा वापर करा. जास्त जुने झालेले ब्रश वापरणे टाळा.
  • गालावर किंवा ओठांवर दात लागून जखम होत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या.

हे सुध्दा वाचा – तोंड येणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Mouth sores, causes and home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *