आईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)

Increase Breast Milk Production in Marathi.

नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व :

नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे.

मग प्रश्न असा येतो की ज्या नावमातांना पुरेसे दूध येत नाही त्यांनी काय करावे? बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे? आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल, कोणता आहार घ्यावा, कोणते उपाय करावेत अशी सर्व उपयुक्त माहिती मराठीत खाली दिली आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आईने पोषक व संतुलित आहार घ्यावा. स्तनपान देणाऱ्या स्त्रीला आहारातून जास्त कॅलरीजची आणि कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वांची खूप गरज असते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या स्त्रीने नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला पाहिजे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आईचे दूध वाढविण्यासाठी उपाय :

• आईचे दूध वाढविण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत.
• मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या, जेवणात शेवग्याच्या शेंगा आणि डाळिंब, सफरचंद, कलिंगड यासारखी फळे असावीत.
• मांसाहार करीत असल्यास मांस, मासे आहारात समाविष्ट करू शकता.
• आहारात नाचणी, बाजरी, गूळ, अळीव, डिंकाचे लाडू, शतावरी, बदाम, खारीक यांचा समावेश असावा. वरील सर्व पदार्थांमुळे स्तनदा मातेमध्ये प्रोलेक्टिन ह्या हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते.
• आहाराबरोबरचं स्तनदा मातेने पुरेसे पाणीही प्यायला हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे.
• डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या ह्या त्यांच्या सूचनेनुसार नियमित घ्यावीत. तसेच काहीवेळा आपले डॉक्टर दूध वाढवणारी औषधे देऊ शकतात. ती औषधेही डॉक्टरांच्या सूचनेनुसार घ्यावीत.

Mother milk increase tips, diet, medicine information in Marathi. Breastfeeding tips Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


© लेखक- डॉ. सतीश उपळकर
वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..