नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व :
नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे.
मग प्रश्न असा येतो की ज्या नावमातांना पुरेसे दूध येत नाही त्यांनी काय करावे? बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे? यासाठी या लेखात आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल याची माहिती दिली आहे.
आईने पोषक व संतुलित आहार घ्यावा. स्तनपान देणाऱ्या स्त्रीला आहारातून जास्त कॅलरीजची आणि कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वांची खूप गरज असते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या स्त्रीने नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला पाहिजे. बाळंतिणीचा आहार कसा असावा ते जाणून घ्या..
आईचे दूध वाढविण्यासाठी हे उपाय करा :
- आईचे दूध वाढण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत.
- मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या, जेवणात शेवग्याच्या शेंगा आणि डाळिंब, सफरचंद, कलिंगड यासारखी फळे खावीत.
- मांसाहार करीत असल्यास मांस, मासे आहारात समाविष्ट करू शकता.
- आहारात नाचणी, बाजरी, गूळ, अळीव, डिंकाचे लाडू, शतावरी, बदाम, खारीक यांचा समावेश करावा. वरील सर्व पदार्थांमुळे स्तनदा मातेमध्ये प्रोलेक्टिन ह्या हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते.
- आहाराबरोबरचं स्तनदा मातेने पुरेसे पाणीही प्यायला हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या ह्या त्यांच्या सूचनेनुसार नियमित घ्यावीत. तसेच काहीवेळा आपले डॉक्टर दूध वाढवणारी औषधे देऊ शकतात. ती औषधेही डॉक्टरांच्या सूचनेनुसार घ्यावीत.
हे सुध्दा वाचा –
बाळंतिणीचा आहार
बाळंतिणीने घ्यायची काळजी
बाळाची घ्यायची काळजी
Read Marathi language article about Breast milk increases diet tips. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.