घशात खवखव होणे –

अनेक कारणांनी आपल्या घशात खवखव होत असते. सर्दी किंवा खोकल्याच्या त्रासात हमखास घशात खवखवते.

घशात खवखवणे यावरील घरगुती उपाय :

1) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
घशात खवखव होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशात खवखवणे दूर होते.

2) आले आणि मध खावे.
घशातील खवखव दूर करण्यासाठी आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आले आणि मधामध्ये आयुर्वेदिक अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

3) गरम द्रव्यपदार्थ प्यावे.
घशात खवखवत असल्यास काळी मिरी, आले, वेलदोडे, लवंग पाण्यात टाकून उकळावे. त्या उकळलेल्या पाण्यात चहापावडर घालून चहा करून गरम असतानाच प्यावा.

4) हळद घालून गरम दूध प्यावे.
घशातील खवखव कमी करण्यासाठी गरम दुधात हळद घालून प्यावे. या घरगुती उपायाने घशाला आराम मिळून खवखव कमी होते.

घशात टोचत असल्यास करायचे उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Itchy Throat home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 9, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *