Dr Satish Upalkar’s article about Hoarseness or aavaj basane in Marathi.
आवाज बसणे –
बऱ्याचदा आपला आवाज बसत असतो. खूप वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो.
या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी आवाज बसल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती सांगितली आहे.
आवाज बसण्याची कारणे :
- बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो.
- घशात इन्फेक्शन झाल्यामुळे,
- सर्दी किंवा खोकला झाल्यामुळे,
- थंडगार पदार्थ खाण्यामुळे आवाज बसतो.
- तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे,
- सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांमुळे,
- याशिवाय थायरॉईड समस्या किंवा घशाचा कर्करोग यांमुळेही आवाज बसू शकतो.
आवाज बसणे यावरील घरगुती उपाय –
1) मधाबरोबर आल्याचा तुकडा खावा.
आवाज बसला असेल तर आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज बसणे यासाठी हा आयुर्वेदिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. कारण आले व मधामुळे घशातील कफ, इन्फेक्शन आणि सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी आवाज बसल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आले व मध खावे.
2) मधाचे चाटण करावे.
आवाज बसणे यावर मध खूप उपयुक्त ठरते. आवाज बसल्यावर वरचेवर चमचाभर मधाचे चाटण करावे.
3) मधाबरोबर काळी मिरी खावी.
ग्लासभर गरम पाण्यात दोन चमचे मध व अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालावी. हे मिश्रण पिण्यामुळे घशाला आराम मिळून आवाज बसणे समस्या दूर होते. याशिवाय अर्धा चमचा काळ्या मिरीची पावडर एक चमचा मधाबरोबर एकत्र करून हे मिश्रण चाटण करणेही उपयुक्त ठरते.
4) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
आवाज बसल्यावर ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होऊन त्रास कमी होतो.
5) मधाबरोबर लिंबाचा रस खावा.
ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. आवाज बसला असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता.
6) लसूण पाकळी चावून खावी.
आवाज बसल्यास एक ते दोन लसूण पाकळी चावून खावी. यामुळेही ही समस्या दूर होते.
आवाज बसला असेल तर काय करावे..?
- आवाज बसल्यास घशाला आराम दिला पाहिजे.
- घशाला ताण देऊन बोलणे किंवा ओरडणे टाळावे.
- थंड पदार्थ खाणे टाळावे.
- जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये.
- आवाज बसल्यास तंबाखू, सिगारेट, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
- गरम द्रव्यपदार्थ प्यावेत.
- आवाज बसणे यावर घरगुती उपाय करूनही आठवड्यात फरक न पडल्यास आपल्या डॉक्टरांकडून घशाची तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत.
हे सुध्दा वाचा – घशाला सूज आल्याबर काय करावे ते जाणून घ्या..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Hoarseness Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).