Dr Satish Upalkar’s article about Common cold home remedies in Marathi.
सर्दी होणे –
बऱ्याचदा सर्दी होत असते. थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्दी हमखास होत असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होते. सर्दी झाल्याने वाहणाऱ्या नाकामुळे जीव अगदी हैराण होत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सर्दीवर करायचे काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत.
<
सर्दीवर करायचे घरगुती उपाय –
गरम दूध आणि हळद –
सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे सर्दी लवकर जाण्यासाठी मदत होते.
आले –
सर्दीवर आले खूप उपयोगी पडते. यासाठी सर्दी झाल्यावर आल्याचा बारीक तुकडा चावून खावा. या उपायाने सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही कमी होतो.
तुळशीच्या पानांचा काढा –
एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा व मिश्रण चांगले उकळावे. हा आले आणि तुळशीचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा. हा उपाय सर्दीवर खूप उपयोगी ठरतो.
लिंबू रस आणि मध –
लिंबूरसात व्हिटॅमिन-C मुबलक असल्याने सर्दी दूर होण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे.
काळी मिरी, सुंठ आणि मध –
सर्दीमध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
सर्दी झाल्यावर घ्यायची काळजी :
- सर्दी झाल्यावर दिवसभरात पुरेसे पाणी व तरल पदार्थ वरचेवर पित राहावे.
- सर्दी झाल्यावर विश्रांती घ्यावी.
- थंड पदार्थ व थंड वातावरणापासून दूर राहावे.
- एसी व फॅनचा वापर करणे टाळावे.
- उबदार कपडे वापरावेत.
- झोपताना उबदार पांघरूण घ्यावे.
- शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची लागण होणार नाही.
हे सुद्धा वाचा –
घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Common cold Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).