Dr Satish Upalkar’s article about runny nose home remedies in Marathi.

नाक वाहणे यावरील घरगुती उपाय article by Dr Satish Upalkar

नाक वाहणे – Runny Nose :

सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते.
तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो.

नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे –

सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक चोंदणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे, डोकेदुखी, अंगदुखी असे त्रास यावेळी होतात.

नाक वाहणे यावर घरगुती उपाय –

सर्दीमुळे नाक वाहत असल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे.

आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक वाहणे कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही यामुळे कमी होतो.

चमचाभर लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. यामुळे सर्दीमुळे नाक वाहणे कमी होते.

काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्याने सर्दीमुळे नाक वाहणे कमी होते.

नाक वाहणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.

हे सुध्दा वाचा – घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..

In this article information about Runny nose home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.