What to do if you have a sore throat?

घसा दुखत असल्यास काय करावे? article by Dr Satish Upalkar

घसा दुखणे – Sore throat :

सर्दी व खोकला येण्यापूर्वी घसा दुखत असतो. तसेच
घशात संसर्ग झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे सूज येऊन घसा दुखू लागतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी घसा दुखत असल्यावर काय करावे याविषयी माहिती सांगितली आहे.

घसा दुखत असेल तर काय करावे ..?

घसा दुखत असल्यास मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशातील सूज कमी होते.

घशात दुखत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घसा दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

घसा दुखत असेल तर मधाबरोबर लवंगा खाव्यात. यासाठी काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो.

घसा दुखल्यास ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.

घसा दुखल्यावर हळद घातलेले गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – घसा बसल्यास काय करावे ते जाणून घ्या..

In this article information about What to do if you have a sore throat in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.