टॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

Tonsillitis in Marathi, Tonsillitis causes, symptoms in Marathi, Tonsillitis treatment in Marathi, Tonsils in Marathi.

टॉन्सिल्स सुजणे किंवा टॉन्सिलिटिस म्हणजे काय..?

टॉन्सिल हे तोंडाच्या आत जीभच्या तळाशी असतात. घातक व्हायरस आणि जीवाणू यांना शरीरात प्रवेश करण्यापासून अटकाव करण्याचे महत्त्वाचे कार्य टॉन्सिल करत असतात. अनेकदा टॉन्सिल जीवाणू व व्हायरसमुळे संक्रमित होतात तेंव्हा टॉन्सिलला सूज येते त्याठिकाणी वेदना होते. अन्न गिळताना आणि श्वास घेताना त्रास होतो.
बहुतेकवेळा टॉन्सिलिटिसचा त्रास दहा दिवसांच्या आत आपोआप कमी होतो. टॉन्सिलला सूज आल्यास त्या आजारास टॉन्सिलिटिस असे म्हणतात.

टॉन्सिलला सूज येण्याची करणे :

Tonsillitis causes in Marathi
• टॉन्सिलला स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचे इन्फेक्शन झाल्याने,
• ‎सर्दी, खोकला अधिक काळ राहिल्यामुळे,
• ‎थंड हवामानामुळे, थंडगार पदार्थ, आईस्क्रीम, फ्रिजमधील गार पाणी पिल्याने टॉन्सिलला सूज येत असते.

टॉन्सिलिटिसची लक्षणे :

Tonsillitis symptoms in Marathi
• टॉन्सिलला सूज येणे.
• ‎घशाला सूज येणे, घशात वेदना होणे, घशात पांढरे चट्टे येतात, घसा खवखवणे.
• ‎तोंड उघडताना त्रास होणे.
• ‎ताप येणे, सर्दी, खोकला असू शकतो.
• ‎अंग मोडून येणे (अंगदुखी), डोकेदुखी, कानात दुखणे.
• ‎अन्न गिळताना व बोलताना त्रास होणे ही लक्षणे जाणवितात. घसा आणि जीवाणूंच्या चाचणीतून टॉन्सिलिटिसचे निदान करता येऊ शकते.

टॉन्सिल्स सुजल्यास कोणती काळजी घ्यावी..?

• पुरेशी विश्रांती घ्यावी.
• ‎आपल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्या.
• ‎अन्न गिळताना त्रास होत असल्यास मऊ पदार्थ खावेत.
• ‎मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने त्रास कमी होऊ शकतो.
• ‎थंडगार पाणी पिणे टाळा, आइस्क्रीम, दही व इतर थंड पदार्थ खाऊ नका.
• ‎धूम्रपान करणे टाळा, हवेच्या प्रदूषणात जाणे टाळा.

टॉन्सिलिटिस उपचार :

Tonsillitis treatments in Marathi
सूज, वेदना आणि ताप यावर वेदनाशामक (
इब्युप्रोफेन किंवा अॅसिटामिनोफेन इ.) औषधे दिली जातील. शिवाय बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास अँटीबायोटिक्सही दिली जातात.डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करा अगदी लक्षणे कमी झाली तरीही दिलेल्या कालावधीपर्यंत औषधे घ्या.

77टॉन्सिलिटिस शस्त्रक्रिया -78
वारंवार टॉन्सिलिटिसचा त्रास होत असल्यास, श्वास घेण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होत असल्यास टॉन्सिल्स काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (operation) केली जाते. त्या ऑपरेशनला टॉन्सिलेक्टॉमीज असे म्हणतात.

खालील उपयुक्त माहितीही वाचा..
गालफुगी किंवा गुलगुंड आजार मराठीत माहिती
अपेंडीक्सला सूज आल्याने होणारी पोटदुखी व उपाय

© कॉपीराईट विशेष सूचना :
वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.