घसा दुखणे –
काहीवेळा आपला घसा दुखू लागतो. सर्दी, खोकल्यासरखे त्रास झाल्यास किंवा घशात इन्फेक्शन झाल्यास घसादुखी होत असते. थंडी किंवा पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. घसा दुखू लागल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते.
घसा दुखीवरील सोपे उपाय –
घसा दुखू लागल्यास मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होऊन घसा दुखणे थांबते.
घसा दुखू लागल्यास मधाबरोबर आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे घशातील संसर्ग कमी होऊन घशात दुखणे थांबते.
घशात सूज आल्याने घसा दुखू लागल्यास हळद घातलेले ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे देखील घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळतो.
घसा दुखणे यावरील टॅबलेट –
घशामध्ये वेदना होण्याबरोबरच खवखवत सुध्दा असल्यास strepsils ही tablet घेऊ शकता. तर घशाला सूज आल्याने घसा दुखत असल्यास ibuprofen, paracetamol किंवा diclofenac ची टॅबलेट घेऊ शकता.
वरील वेदनाशामक गोळीमुळे घसा दुखणे कमी होईल. मात्र अपचन होणे, मळमळ होणे, पित्त वाढणे, डोके दुखणे, संडासला लागणे असे साईड इफेक्ट्स या वेदनाशामक गोळीमुळे होऊ शकतात. त्यामुळे घसा दुखत असल्यास गोळी घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून पहावेत. सोप्या घरगुती उपायांनी हा त्रास लगेच कमी होत असतो.
ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तसेच अल्सर, हाय ब्लड प्रेशर, किडनी विकार असणारे रुग्ण, गरोदर स्त्रिया यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही वेदनाशामक गोळी घेऊ नये.
हे सुध्दा वाचा – घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about throat pain and tablet. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.