कोरडा खोकला म्हणजे काय?
बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात.
कोरडा खोकला येण्याची कारणे –
इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय सर्दी पडसे, घशातील इन्फेक्शन, घशातील सूज, अस्थमा, सायनसचा त्रास यामुळे कोरडा खोकला येऊ शकतो.
कोरडा खोकला लक्षणे –
कोरड्या खोकल्यात सारखी खोकल्याची उबळ येत असते. मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. कोरड्या खोकल्यात खोकून खोकून अगदी हैराण व्हायला होते. यामुळे जीव कासावीस होत असतो. अशी लक्षणे यात असतात.
कोरडा खोकला येणे यावरील उपाय –
उपाय क्रमांक 1 –
थोड्या मधात सुंठ मिसळून मिश्रण तयार करावे. कोरडा खोकला येत असल्यास ह्या मिश्रणाचे चाटण दिवसभरात दोन ते तीन वेळा करावे.
उपाय क्रमांक 2 –
कोरडा खोकला येत असल्यास चमचाभर मध खावा. मधामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोरड्या खोकल्याची समस्या मध खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते.
उपाय क्रमांक 3 –
कोरडा खोकला येत असल्यास दोन ते तीन काळ्या मिरी बारीक वाटून तुपातून खावी. या उपायाने देखील कोरडा खोकला कमी होतो.
उपाय क्रमांक 4 –
कोरडा खोकला येत असल्यास गरम दुधात हळद घालून प्यावे. यामुळे घशाला आराम मिळून कोरडा खोकला दूर होण्यास मदत होते.
उपाय क्रमांक 5 –
कोरड्या खोकल्याची सारखी उबळ येत असल्यास खडीसाखर चघळत रहावे. यामुळेही कोरडा खोकला लवकर कमी होतो.
हे सुध्दा वाचा – सर्दीवरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Dry Cough causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 24, 2024.
this is the best treatment of kuf and thanku for this idea
I alwys use this idea
this is the best treatment of kuf and thanku for this idea
I alwys use