Home remedies to get your voice back When You Have Laryngitis.
आवाज बसणे (Laryngitis) –
खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय –
उपाय क्रमांक 1 –
आवाज बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज मोकळा होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी पडतो. कारण आले व मधामुळे घशातील कफ, इन्फेक्शन आणि सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी आवाज बसल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा आले व मध खावे.
उपाय क्रमांक 2 –
आवाज बसल्यावर वरचेवर चमचाभर मधाचे चाटण करावे. यामुळेही आवाज मोकळा होण्यासाठी मदत होते.
उपाय क्रमांक 3 –
आवाज साफ होण्यासाठी अर्धा चमचा काळ्या मिरीची पावडर एक चमचा मधाबरोबर एकत्र करून खावी.
उपाय क्रमांक 4 –
आवाज बसल्यावर ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होऊन आवाज साफ होतो.
आवाज बसल्यास घ्यायची काळजी –
- आवाज बसल्यास घशाला आराम दिला पाहिजे.
- घशाला ताण देऊन बोलणे किंवा ओरडणे टाळावे.
- थंड पदार्थ खाणे टाळावे.
- जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये.
- आवाज बसल्यास तंबाखू, सिगारेट, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
- गरम द्रव्यपदार्थ प्यावेत.
- घरगुती उपाय करूनही आवाज सुधारत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडून घशाची तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत.
हे सुध्दा वाचा – घशाला सूज आल्यास हे करा उपाय..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this marathi language article information about How to Get Your Voice Back Quickly When You Have Laryngitis. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).