Dr Satish Upalkar’s article about itchy throat home remedies in Marathi.

ghashat khaj yene upay in marathi article by Dr Satish Upalkar.

घशाला खाज येणे :

अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते.

घशात खाज सुटणे यावरील उपाय :

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशातील खाज कमी होते.

आल्याचा तुकडा मधाबरोबर खावा.
घशात खाज येत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात खाज सुटणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

दुधात हळद घालून प्यावे.
घशात खाज येत असल्यास गरम दुधात हळद घालून ते दूध प्यावे. यामुळे घशाला आलेली सूज कमी होऊन आराम मिळून घशाला खाज सुटणे कमी होते.

गरम द्रव्यपदार्थ प्यावेत.
घशाला खाज सुटत असल्यास काळी मिरी, आले, वेलदोडे, लवंग पाण्यात टाकून उकळावे. त्या उकळलेल्या पाण्यात चहापावडर घालून चहा करून गरम असतानाच प्यावा. यामुळेही घशात खाज सुटणे कमी होते.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – घशात दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..

In this article information about itchy throat home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.