Swollen Gums home remedies in Marathi.

Hridaya suj kami karnyasathi upay in Marathi article by Dr Satish Upalkar.

हिरड्यांची सूज –

आपल्या हिरड्यांना काहीवेळा सूज येत असते. हिरड्या सुजल्याने ब्रश करताना किंवा अन्नपदार्थ चावताना तेथे दुखू लागते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत याची माहिती सांगितली आहे.

हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय –

हिरड्या सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

दाढेत लवंग धरून ठेवल्याने हिरडीची सूज लवकर कमी होते.

आल्याच्या पेस्टमध्ये मीठ मिसळून ती पेस्ट सूज आलेल्या हिरडीस लावावी. दहा मिनिटांनी चूळ भरून तोंड धुवावे. यामुळे हिरड्याची सूज कमी होते.

हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी तेथे थोडासा बेकिंग सोडा लावावा. हा घरगुती उपाय या त्रासावर चांगला आहे.

मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून त्याचा लेप सुजलेल्या हिरड्यावर लावावा. यामुळेही हिरड्याची सूज कमी होते.

हिरड्यांची घ्यायची काळजी –

  • तोंडाची स्वच्छता ठेवावी. यासाठी नियमित दात घासावेत.
  • सकाळी व रात्री असे दोनदा दात घासावेत.
  • दात घासताना हिरडीस इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
  • तंबाखू, पानमसाला, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
  • घरगुती उपायांनी हिरड्यांची सूज कमी न झाल्यास डेटींस्टकडे जावे.
Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – हिरड्या मजबूत करण्यासाठी करायचे उपाय जाणून घ्या..

4 Sources

In this article information about Swollen Gums Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published.