दही (Curd) –
दही हे एक पौष्टिक पदार्थ आहे. यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. मात्र तरीही दही खाताना काही काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ दही बरोबर खाल्यास आरोग्यासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता असते.
दह्या सोबत काय खाऊ नये असे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत.
1) दह्या बरोबर फळे खाऊ नयेत.
ताजी फळे ही दहीसोबत खाल्याने पचनसंस्था बिघडू शकते. कारण ताज्या फळांमध्ये फायबर असते जे दही बरोबर एकत्रित झाल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे दह्या बरोबर कोणतीही फळे खाऊ नका.
2) दही सोबत आंबा खाऊ नये.
आंबा हा उष्ण असतो तर दही थंड गुणाचे असते. त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन करू नये. दह्या सोबत आंबा खाल्यास पोटात गॅस होणे, अपचन आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे कधीही दही सोबत आंबा खाऊ नका.
3) दह्या बरोबर कांदा खाऊ नये.
कांदा देखील उष्ण असतो तर दही हे थंड गुणाचे असते. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने पोटात गॅस, अपचन आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे दह्या बरोबर कांदा खाऊ नये.
4) दही बरोबर आळंबी खाऊ नये.
मशरूम सोबत दही खाल्यास ते अपायकारक ठरू शकते. यामुळे पोट बिघडणे, पोटात गॅस होणे आणि उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे दही बरोबर आळंबी खाऊ नका.
5) दह्या सोबत मासे, मटण किंवा चिकन खाऊ नये.
मटण, चिकन आणि मासे ह्यातील प्रोटीन आणि दह्यातील प्रोटीन हे वेगवेगळे असते. त्यामुळे दही सोबत मटण, चिकन आणि मासे असे मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास ते अपायकारक ठरू शकते. यामुळे अपचन होणे, उलट्या होणे, अतिसार, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे दह्या सोबत मासे, मटण किंवा चिकन खाऊ नये.
6) दही सोबत गरम पदार्थ खाऊ नये.
दही आणि गरम पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ होणे, अल्सर होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे दही सोबत गरम पदार्थ खाऊ नका.
7) दही सोबत दूध पिणे टाळावे.
दही सोबत दूध पिणे अपायकारक ठरते. यामुळे पोट बिघडणे, पोटात गॅस होणे आणि उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे दही सोबत दूध पिणे टाळावे.
8) दह्या सोबत आंबट पदार्थ खाऊ नये.
संत्री, मोसंबी, लिंबू अशी आंबट फळे तसेच इडली, डोसा असे आंबट पदार्थ कधीही दह्याबरोबर खाऊ नयेत. कारण यामुळे पित्त वाढते.
हे सुध्दा वाचा – दही खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान जाणून घ्या..
Read Marathi language article about What should not be eaten after eating Curd? Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 8, 2024.