बऱ्याच स्त्रियांना नियमित पाळी येत नाही. या त्रासाला Secondary Amenorrhea असे म्हणतात. जर 5 ते 6 महिन्यापर्यंत पाळी न आल्यास स्त्रीरोग तज्ज्ञकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पाळी अनियमित होण्यासाठी अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे जबाबदार असतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि त्या जोडीला रक्त वाढवणारी आयुर्वेदिक औषधे घेतल्यास हा त्रास दूर होऊन पाळी नियमित येण्यासाठी मदत होते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे?
1) नियमित व्यायाम करावा.
व्यायाम हा हार्मोन्सच्या संतुलनासाठी आणि मासिक पाळीच्या नियमिततेसाठी आवश्यक आहे. व्यायामाने वजनही आटोक्यात राहते. यासाठी दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. व्यायामात चालणे, सायकलिंग, झुंबा डान्स असे व्यायाम करू शकता. विविध योगासने देखील यासाठी उपयोगी पडतात.
2) तणावापासून दूर राहावे.
मासिक पाळी अनियमित होण्यासाठी मानसिक ताणतणाव हे एक प्रमुख कारण असते. म्हणून पाळी येण्यासाठी तणावापासून दूर राहिले पाहिजे. यासाठी प्राणायाम, ध्यान, धारणा करावी, मोकळ्या हवेत फिरायला जावे,
3) योग्य आहार घ्यावा.
मासिक पाळी येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, सुकामेवा यांचा समावेश असला पाहिजे. तसेच फास्टफुड, मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, मिठाई, तेलकट पदार्थ असे चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे.
4) पुरेशी झोप घ्या.
पुरेशी झोप ही हार्मोन्सच्या संतुलनासाठी आवश्यक असते. पाळी येण्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. यासाठी दररोज रात्री 7-8 तासांची झोप घ्या.
मासिक पाळी येण्यासाठी काही घरगुती उपाय –
1) ओवा –
मासिक पाळी येण्यासाठी ओवा खूप प्रभावी ठरतो. कारण ओव्यामध्ये एस्ट्रोजन हार्मोनसारखे गुणधर्म असतात, जे मासिक पाळी येण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा ओवा पाण्यात उकळवून गाळून घ्या. हा ओव्याचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा.
2) ओवा आणि गूळ –
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा आणि थोडासा गूळ ग्लासभर पाण्यात भिजत घालावा. आणि सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ते मिश्रण प्यावे. या उपायाने मासिक पाळी येण्यासाठी मदत होते.
3) बडीशेप –
बडीशेपमध्ये देखील मासिक पाळी येण्यासाठी उपयुक्त असे गुणधर्म असतात. बडीशेपमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स असतात. यामुळे मासिक पाळी येण्यासाठी मदत होते. यासाठी चमचाभर बडीशेप पाण्यात उकळवून गाळून घ्या. हा बडीशेपचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा.
4) आले –
मासिक पाळी येण्यासाठी आले हा एक उत्तम असा घरगुती उपाय आहे. आल्यात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा आले पाण्यात उकळवून गाळून घ्या. हा आल्याचा काढा दिवसातून दोन वेळा प्यावा. किंवा तुम्ही आल्याचा चहा करून देखील पिऊ शकता.
5) दूध आणि हळद –
मासिक पाळी येण्यासाठी गरम दुधात थोडीशी हळद घालून प्यावे. हळदीत देखील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
6) कच्ची पपई –
कच्च्या पपईमध्ये एस्ट्रोजन हार्मोनसारखे गुणधर्म असतात. कच्ची पपई खाल्ल्याने मासिक पाळी येण्यासाठी मदत होते.
वरील उपाय केल्याने मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होईल. मात्र जर हे घरगुती उपाय करून देखील मासिक पाळी येत नसेल तर, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
वयाच्या 17 ते 18व्या वर्षांपर्यंत जर मुलीला पाळी सुरू न झाल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घेणे आवश्यक असते. या समस्येला Primary Amenorrhea असे म्हणतात.
हे सुध्दा वाचा – मासिक पाळी विषयी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about home remedies for missed periods. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.