Diet tips for missed periods in Marathi.
काही स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही. या समस्येला Secondary Amenorrhea असे म्हणतात. प्रामुख्याने अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात.
मासिक पाळी येण्यासाठी काय खावे ..?
मासिक पाळी नियमित येण्यासाठी संतुलित आहार खाणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, सुकामेवा यांचा समावेश असला पाहिजे. ताज्या फळात आणि हिरव्या भाज्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडेंट सारखे पोषक घातक असतात, जे मासिक पाळी येण्यास मदत करतात. याशिवाय दिवसभरात पुरेसे पाणी देखील प्यावे.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी चरबी वाढवणाऱ्या पदार्थापासून दूर राहावे. यासाठी फास्टफुड, मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, मिठाई, तेलकट पदार्थ असे चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे. कारण असे पदार्थ खाल्याने चरबी व अनावश्यक वजन वाढत असते. वजन वाढल्यामुळे पाळी अनियमित होत असते. यासाठी वजन आटोक्यात असणे आवश्यक आहे. म्हणून चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
मासिक पाळी लवकर येण्यासाठी आणखी काय खावे ..?
मासिक पाळी नियमित येण्यासाठी ओवा किंवा बडीशेप चा काढा करून प्यावा. यासाठी चमचाभर ओवा किंवा बडीशेप पाण्यात घालून ते पाणी उकळावे. हे पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन प्यावे. यामुळे पाळी वेळेवर येण्यासाठी मदत होते. आल्याचा चहा करून पिण्यामुळे देखील पाळी नियमित येण्यास मदत होते. याशिवाय कच्ची पपई खाण्यामुळे पाळी लवकर येण्यास मदत होते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – मासिक पाळी नियमित येण्यासाठी करायचे उपाय जाणून घ्या..
In this article information about Diet tips for Missed period in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.