मासिक पाळी मध्ये संबंध ठेवावा की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न पडलेले असतात. याबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जसे की, मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे अशुद्ध आहे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक आहे वैगेरे वैगेरे.. मात्र. ह्या गैरसमजांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने काही फायदे देखील होऊ शकतात. जसे की, मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने रक्तस्त्राव कमी होऊ शकतो आणि पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात. तसेच मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने महिलांना अधिक उत्तेजित वाटू शकते आणि त्यांचे मन प्रसन्न होण्यास मदत होऊ शकते.
मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे की नाही?
दोघांचीही मानसिक तयारी असल्यास मासिक पाळी मध्ये संबंध ठेऊ शकता. मात्र यावेळी थोडी काळजी घ्यावी लागते. कारण मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा योनीत संसर्ग होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच मासिक पाळीत संबंध ठेवावेत.
मासिक पाळी मध्ये संबंध ठेवण्यामुळे काय होऊ शकते?
- मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने गर्भधारणा होऊ शकते. मात्र, यावेळी गर्भधारणा होण्याची शक्यता थोडी कमी असते. तरीही गर्भधारणा होण्याची शक्यता ही असतेच.
- मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवल्याने योनीत संसर्ग होऊ शकतो. कंडोमचा वापर केल्याने हा धोका कमी होतो.
- मासिक पाळीत संबंध ठेवल्याने काही महिलांना जास्त वेदना जाणवू शकतात.
मासिक पाळीत संबंध ठेवताना घ्यायची काळजी –
- मासिक पाळी दरम्यान संबंध ठेवण्यात तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारला स्वारस्य असल्याची खात्री करा.
- संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर योनी स्वच्छ करावी.
- मासिक पाळी मध्ये संबंध ठेवताना कंडोम वापरला पाहिजे. यामुळे योनीत संसर्ग होत नाही.
- जर तुम्हाला मासिक पाळीत संबंध ठेवताना कोणतीही वेदना होत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर संबंध थांबवा.
मासिक पाळीत संबंध ठेवणे शक्य आहे, परंतु स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास ही विचारात घेणे गरजेचे असते. मासिक पाळीच्या वेळी वेदना होत असल्यास थोडी विश्रांती देखील मिळणे आवश्यक असते.
हे सुध्दा वाचा – मासिक पाळी विषयी अधिक माहिती जाणून घ्या..
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.